लखनऊ: अफगाणिस्तानच्या तालिबानींना घाबरण्याची गरज नाही. तालिबानहून अधिक क्रुरता भारतात असल्याचे आक्षेपार्ह विधान उर्दूचे शायर मुनव्वर राणा यांनी क
लखनऊ: अफगाणिस्तानच्या तालिबानींना घाबरण्याची गरज नाही. तालिबानहून अधिक क्रुरता भारतात असल्याचे आक्षेपार्ह विधान उर्दूचे शायर मुनव्वर राणा यांनी केलेय.
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर मुस्लिम समुदायातील काही लोकांकडून वादग्रस्त विधाने होत आहेत. यामध्ये आता उर्दूचे शायर मुनव्वर राणा यांचाही समावेश झालाय. याबाबत राणा म्हणाले की, तालिबान इतकीच क्रूरता भारतातही आहे. देशात कधीकाळी राम राज्य होते परंतु, आता कामराज्य आहे. भारताने तालिबानला घाबरण्याची गरज नाही. पाठाण लोक भारताच्या विरोधात नाहीत. यापूर्वीही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. त्यावेळी देखील कधी त्यांनी भारताच्या विरोधात कुठली भूमिका घेतली नाही. जितक्या एके-47 तालिबानींकडे आहेत तितक्याच बंदुका भारतातील माफियांकडे आहेत. तालिबानी हत्यारं लुटून किंवा मागून घेतात परंतु आपल्या येथील माफीया हत्यारे खरेदी करतात असा आरोप राणा यांनी केला. यावेळी त्यांनी हिंदू देखील तालिबानी असल्याचा आक्षेपार्ह आणि गंभीर आरोप केला. मुन्नवर राणा यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणावर वादग्रस्त विधाने केली आहेत.
COMMENTS