तारळे विभागातील डफळवाडी येथे बिबट्याकडून शेळीचा फडशा

Homeमहाराष्ट्रसातारा

तारळे विभागातील डफळवाडी येथे बिबट्याकडून शेळीचा फडशा

डफळवाडी येथे भरदुपारी तीनच्या सुमारास बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. शेतकरी महिलेच्या डोळ्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये 2 बडया अधिकार्‍यांकडे कोटयावधींचे घबाड
मुंबई पोलिस भरतीत हायटेक कॉपी
MPSC परीक्षेत अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या | LOK News 24

तारळे / वार्ताहर : डफळवाडी येथे भरदुपारी तीनच्या सुमारास बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. शेतकरी महिलेच्या डोळ्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डफळवाडी डोंगरावर वसली आहे. शेती व पशुपालन हाच प्रमुख तेथील लोकांचा व्यवसाय आहे. 

येथील बाबूराव सपकाळ जनावरे व शेळींचे पालन करतात. नेहमी गावाच्या वरील बाजूला ते आपली जनावरे चारायला घेऊन जातात. काल त्यांच्या सून जयश्री सपकाळ जनावरे घेऊन डाग नावाच्या शिवारात गेल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास डोंगराच्या आडून बिबट्याने कळपावर हल्ला केला. यात एक शेळी बिबट्याच्या तावडीत सापडली. आधी बिबट्याने तिची मान धरली नंतर पोट फाडले. हे सर्व भरदुपारी तीन वाजता जयश्री यांच्यासमोर घडल्याने त्यांची पाचावरधारण झाली होती. काही वेळानंतर त्यांनी आरडा-ओरडा केल्यावर परिसरातील गुराखी धावत आले. त्यांच्या आवाजाने बिबट्याने शेळी तेथेच टाकून डोंगरात धूम ठोकली. यामुळे परिसरातील लोकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने संबंधित शेतकर्‍याला भरपाई देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS