तातडीने ऑक्सिजन मिळाल्याने  वीस जणांना जीवदान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तातडीने ऑक्सिजन मिळाल्याने वीस जणांना जीवदान

पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 20 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

पुस्तकांच्या विश्वात मुले रमली
अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या रोमिओवर गुन्हा दाखल
ताई-नानांचा अभिष्टचिंतन,मावंदे उद्यापन कार्यक्रम उत्साहात !

पुणे / प्रतिनिधी: पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 20 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. येथील ऑक्सिजन संपत आला होता, ही आणिबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन कोथरुड पोलिसांनी रुग्णालयांशी संपर्क साधून एका तासाभरात ऑक्सिजनचे चार जम्बो सिलेंडर उपलब्ध करून दिले. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कंठाशी प्राण आलेल्या 20 रुग्णांना जीवदान मिळू शकले. 

कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यांना फोनवरून माहिती देण्यात आली. त्यात रुग्णालयातील 20 रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यांचा ऑक्सिजनचा साठा संपला असून केवळ 30 ते 45 मिनिटे पुरेल, इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. कोठेही जागा नसल्याने रुग्णांना हलविणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. ही आणिबाणीची स्थिती लक्षात घेऊन कोथरुड पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार कोथरुड परिसरातील सर्व हॉस्पिटलशी संपर्क साधू लागले. त्यात सूर्यप्रभा रुग्णालय व सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून ऑक्सिजन मिळू शकेल, असे दिसून आले. त्याबरोबर पोलिसांनी तातडीने क्रेन व शिवाजीनगर येथून ड्युरा सिलेंडर आणण्याकरीता वाहन उपलब्ध करून देण्यात आले. या वाहनांना पोलिस एक्सॉर्ट व पायलेटिंग करून केवळ एक तासाच्या आत हे ऑक्सिजन सिलेंडर कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोहचवले. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणार्‍या संभाव्य दुर्घटनेपासून रुग्णांचा बचाव करता आला.

COMMENTS