तळेगाव-मळेला नागरीकांची केली कोरोना तपासणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तळेगाव-मळेला नागरीकांची केली कोरोना तपासणी

मागिल महिन्यात कोरोनाने थैमान घातले.व्यवहार ठप्प होते.सध्या कोरोनाने काढता पाय घेतला असला तरी जिल्ह्यातील ताळेबंदी उठवल्यामुळे गावातील व्यवहारांस प्रारंभ करण्यापुर्वी  तळेगाव मळे येथे सोमवारी कोरोनाची उपाय योजना म्हणून तपासणी कॕम्प घेण्यात आला. 

वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिल्याने निवडणूक संधी…
कोपरगाव नगरपरिषदेकडून मतदान स्पर्धेचे आयोजन ः मुख्याधिकारी जगताप
महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाचा मोर्चा

कोपरगाव प्रतिनिधी : मागिल महिन्यात कोरोनाने थैमान घातले.व्यवहार ठप्प होते.सध्या कोरोनाने काढता पाय घेतला असला तरी जिल्ह्यातील ताळेबंदी उठवल्यामुळे गावातील व्यवहारांस प्रारंभ करण्यापुर्वी  तळेगाव मळे येथे सोमवारी कोरोनाची उपाय योजना म्हणून तपासणी कॕम्प घेण्यात आला. 

    यामध्ये गावकऱ्यांनी चांगले सहकार्य केले. यामध्ये रॕपिड आणि आरटीपिसीआर  या दोन्ही टेस्ट करण्यात आल्या  यामध्ये रॕपीड-१०४ तर आरटिपिसीआर -८०चाचण्या घेण्यात आल्या. या  चाचणीत कुणीही बाधित आढळून आले नाही. यावेळी गावचे सरपंच सचिन क्षिरसागर,ग्रामसेवक किरण राठोड, उपसरपंच आशा टुपके कामगार पोलीस पाटील मंगलताई टुपके कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी  तसेच आरोग्य केंद्राच्या परमल बी.के. ,रईस शेख, चंद्रकला गुंजाळ ,सुजाता निकम ,भावराव देवकर गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने आरोग्य कर्मचारी यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..

COMMENTS