तक्रारदार गायब, पण खटला सुरू !;परमबीर सिंहांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तक्रारदार गायब, पण खटला सुरू !;परमबीर सिंहांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

औरंगाबाद :देशातील न्यायव्यवस्थेत बदल व्हावेत, हे सांगतांना, देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजे,त अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे, असे मत मुख्यमंत्

राजकारणात टोळीयुद्ध सुरू ः राजू शेट्टी
औरंगाबाद जिल्ह्याकडे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील : डॉ. भागवत कराड

औरंगाबाद :देशातील न्यायव्यवस्थेत बदल व्हावेत, हे सांगतांना, देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजे,त अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे ‘ब’ आणि ‘क’ टप्प्याचे उद्धाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी परमबीर सिंहांचा देखील चांगलाच समाचार घेतला. आमच्याकडे तक्रारदार गायब आहे, मात्र खटला सुरू आहे, अशी परिस्थिती त्यांनी यावेळी नामोल्लेख टाळत मांडली.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा कोर्टात जाऊन जाऊन आयुष्य निघून जाते. त्याचा खर्च परवडत नाही. 1958 सालापासून एक आरोपी गायब असल्याचे तुम्ही म्हणता. पण चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ, खणले जाते, चौकश्या सुरू आहे. धाडसत्रे सुरू आहे. या पद्धतीला चौकट आणण्याची गरज आहे, असे सांगतानाच न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे. हे टीमवर्क आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आज अप्रतिम अशा न्यायमंदिराचे लोकार्पण होत आहे. या न्यायमंदिराच्या भूमीपूजनाला मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो आहे. ही इमारत पाहण्यासाठी लोक आले पाहिजेत, असे मला वाटते. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात मात्र, ही वास्तू पाहण्यासाठी यावे लागेल. लोकांना पकडून आणण्याची वेळ येता कामा नये, असेही मिश्किलीने ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तारीख पे तारीख मध्ये सर्वसामान्य पिचला जातो. न्याययंत्रणा गतीमान होण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करु, असं देखील त्यांनी वचन दिलं आहे. तसेच हायकोर्टाची नवीन इमारत उभी करण्याचं आश्‍वासन देखील त्यांनी दिलं आहे. लोकशाहीचे स्तंभ कुणाच्याही दबावाने कोसळू नयेत तसेच समाज एवढा सुधारला पाहिजे गुन्हेगारी नष्टच झाली पाहिजे आणि देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरण रिजीजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती ए. एस. ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता उपस्थित होते.


केंद्र-राज्यांच्या अधिकारांचा पुन्हा आढावा घेण्याची गरज
कुणी कुठल्या पदावर बसला म्हणजे तुमच्या मर्जीने देश चालावा असे नाही, मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना स्वातंत्र्यावर ‘अमृतमंथन’ करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकारांचा आढावा घेतला पाहिजे. केंद्राप्रमाणेच राज्य सार्वभौम असेल तर ते अधिकार आपण वापरत आहोत का? याचाही विचार करायला हवा, असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.

COMMENTS