ड्रग नेक्सस उघडणार होते पण… मलिकांना नियती माफ करणार नाही.. राणे भडकले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रग नेक्सस उघडणार होते पण… मलिकांना नियती माफ करणार नाही.. राणे भडकले…

प्रतिनिधी : मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत. बनावट दाखले सादर करून अनुसुचित

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची स्थापना – जितेंद्र भावे  
वाझे यांनी नष्ट केलेले पुरावे एनआएच्या हाती
ना.विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

प्रतिनिधी : मुंबई

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत. बनावट दाखले सादर करून अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला, 

असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांना नियती माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “एका ड्रग पार्टीमध्ये रेड पडली, सेलिब्रिटीचा मुलगा पकडला गेला, गुन्हा मान्य केला, ड्रग नेक्सस उघडणार होते 

तेवढ्यात एक मंत्री ड्रग माफियाची बाजू घेऊ लागला आणि आज ते मॅटर ड्रग नेक्ससचे नसून ज्या अधिकाऱ्यांनी रेड मारली, त्याच्या जातीवर आलंय. नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही.” अशी टीका राणेंनी मलिकांवर केली आहे.

COMMENTS