डोळ्यांसाठीही आहेत व्यायाम… फायदे असे आहेत की विश्वास बसणार नाही…

Homeताज्या बातम्याफीचर

डोळ्यांसाठीही आहेत व्यायाम… फायदे असे आहेत की विश्वास बसणार नाही…

वेब टीम : पुणे आपण डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी खालील व्यायाम करू शकतो. १. आय ब्लिंकिंग (Eye Blinking) : आय ब्लिंकिंग म्हणजे डोळ्यांची उघडझा

अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री ; गुन्हा दाखल
राज्यातील कुंभार समाजाचे प्रश्न मार्गी लावणार- भुजबळ
गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला ः केंद्राच्या सूचना

वेब टीम : पुणे

आपण डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी खालील व्यायाम करू शकतो.

१. आय ब्लिंकिंग (Eye Blinking) :

आय ब्लिंकिंग म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणे. जेंव्हा आपण डोळ्याची उघडझाप करतो तेव्हा डोळे स्वच्छ होतात. आणि डोळ्यांना विश्रांती मिळते.

२. पामिंग (Palming):

जेव्हा आपल्याला डोळ्यांवर ताण जाणवतो. तेंव्हा आपले हात एकमेकांवर चोळून ते बंद डोळ्यांवर ठेवावे. असे केल्याने डोळ्यांनी विश्रांती मिळेल. या व्यायामाला पामिंग (Palming) असे म्हणतात.

३. आय प्रेस (Eye Press):

आय प्रेस म्हणजेच डोळे दाबणे किंवा डोळ्यांची मसाज करणे. हा व्यायाम केल्यामुळे डोळ्यांमधील रक्ताभिसरण क्रिया सुधारते. आणि डोळ्याचे स्नायू बळकट होतात. हा व्यायाम करताना डोळे बंद करून हातांनी डोळे हळूहळू दबावेत.

४. आय रोल (Eye Roll):

या व्यायामामध्ये आपले डोळे गोलगोल फिरवावेत. एकदा एका बाजूने १० वेळा आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने डोळे फिरवावे.

५. डिरेक्शनल आय मुव्हमेंट (Directional Eye Movement):

या व्यायामामध्ये आपले नजर डाव्या कोपऱ्यात त्यांनतर उजव्या कोपऱ्यात न्यावी. हि क्रिया १० वेळा करावी.

वरील सर्व व्यायाम नियमित केल्यास डोळ्यांचे आरोग्य नक्की सुधारेल.

COMMENTS