डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती स्थापन

Homeमहाराष्ट्रसातारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती स्थापन

राजकीय, धार्मिक, सामाजिक आदी संघटनांना एकत्रीत करून डॉ.

औंदाणे ग्रामपंचायतीच्या दिव्यांग व मागासवर्गीय निधीतून साहित्य वाटप
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील

एकाच छताखाली वज्रमुठ बांधल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण 

सातारा / प्रतिनिधी : राजकीय, धार्मिक, सामाजिक आदी संघटनांना एकत्रीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून बुधवार, दि. 31 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुढील कार्यवाहीसाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये सर्वस्तरीय पहिली सहविचार सभेत जयंती महोत्सवाबाबत घोषणा झाली. संविधान लोकजागर परिषदेत अभिनंदन ठराव, समिती गठीत सभा व रिपाइंची स्वतंत्र अशा 4 सहविचार सभा झाल्या होत्या. 

या समितीत वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाजवादी पार्टी, बामसेफ, संविधान लोकजागर परिषद, भारतीय बौध्द महासभा, त्रिरत्न संघ, राष्ट्रोत्सव संयोजन समिती, धम्मशील चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मबांधव उत्सव कमिटी, कास्ट्राईब आदी विविध तत्सम संघटनांचा समावेश असून सर्व धर्मियांना स्थान दिले आहे. प्रत्येक संघटनेचे किमान 2 सदस्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून आतापर्यंत 50 इतकी संख्या झाली आहे. अजूनही प्रतिनिधीत्व देणे बाकी आहे. तेंव्हा उर्वरित संघटनेने संपर्क साधावा./दि.31’च्या सहविचार सभेस उपस्थित रहावे. संभाव्य अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांच्या नावाचा प्रस्ताव अनिल वीर यांनी मांडला असून उपस्थितांनी सर्वसमावेशक नेतृत्व असल्याचे मान्य केलेले आहे. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व, नियम, अटी व शर्तीन्वये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

एका छताखाली वर्षभर कार्यक्रम राबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची संकल्पना सर्वांनुमते पुढे आली. यावेळी चंद्रकांत खंडाईत, अमर गायकवाड, सीताराम गायकवाड, प्रा. माणिक आढाव, प्राचार्य मोहन शिर्के, संजय नितनवरे, रफिक मुलाणी, शाहीर माधव भोसले, पी. टी. कांबळे, अशोक भोसले, रामचंद्र गायकवाड, सीताराम गायकवाड, विलास कांबळे, शामराव बनसोडे, अ‍ॅड. विलास वहागावकर, मनोहर सावंत यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. गौतम भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.

दरम्यान, दुसर्‍या सहविचार सभेत सर्व घटकांना स्थान दिले आहे. त्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून अजूनही प्रतिनिधीसाठी नावनोंदणी सुरु आहे. अंतिम निर्णय येत्या बुधवारी  होणार आहे. तेंव्हा कार्यक्रमाचे स्वरूप, अध्यक्षासह इतर विस्तारित कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. येत्या बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित यावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. एका छताखाली झालेल्या जयंती महोत्सव समिती स्थापन झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS