डॉक्टरांना धमकीः इशार्‍यानंतर नगरसेवकाची माफी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टरांना धमकीः इशार्‍यानंतर नगरसेवकाची माफी

मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक संध्या दोषी यांनी डॉक्टरांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला.

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देवून गौरविण्यात यावे – मदन हातागळे,साईनाथ अडागळे
माजी प्राचार्य कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान    
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्‍या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप

 मुंबई/प्रतिनिधी : मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक संध्या दोषी यांनी डॉक्टरांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला. मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्ष असलेल्या संध्या दोषी यांनी वांद्र्यातील भगवती रुग्णालयात हुज्जत घातली होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला. महापैार किशोरी पेडणेकर यांनी समज दिल्यानंतर दोषी यांनी माफीनामा सादर केला.  

दोषी यांचा भगवती रुग्णालयातील डॉक्टरांसोबत वाद घालतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये ‘अशा दहा हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टर उभे करू शकते. माझ्या नातेवाइकांसोबत तुमची भाषा घाणेरडी होती. डॉक्टरांना सौजन्याने बोलायला शिकवा,’ असे दोषी म्हणताना दिसते. कोरोना काळात रुग्णांसाठी दिवसरात्र सेवा देणार्‍या डॉक्टरांना नगरसेवकाने रुग्णालयात दमदाटी केल्याने संताप व्यक्त केला जात होता. याचा निषेध म्हणून भगवती रुग्णालयातील सर्व डॉक्टर सामूहिक राजीनामा देत होते; परंतु संध्या दोषी यांनी माफी मागितल्याने वादावर पडदा पडला.

दोषी यांनी दमदाटी केली नसल्याचा दावा केला होता. कोणतीही दमदाटी केलेली नाही. ही पहिली-दुसरी नाही, तर तिसरी वेळ आहे. मी माझी कामे सोडून तिथे गेले, तेव्हा रुग्ण एक तासापासून त्रस्त होता. खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन तो तिथे आला होता. त्याची ऑक्सिजन लेव्हल 92 होती. तासाभरानंतर त्याची लेव्हल 67 होऊनही डॉक्टरांनी कार्यवाही केली नाही. ऑक्सिजन लावला नाही, त्यामुळे रुग्णाच्या पत्नीने मला फोन केला आणि त्या रडायला लागल्या, असे त्यांनी सांगितले. त्या पेशंटसाठी आपण एक दिवस आधी बेड बुक करून ठेवला होता; पण डॉक्टरांची वागणूक अशी होती, की जोपर्यंत डीनचा फोन येणार नाही, तोपर्यंत आम्ही अ‍ॅडमिट करणार नाही. रुग्ण व्हिलचेअरवर होता, त्याची पत्नी रडवेली झाली होती. मी तिथे पोहोचल्यानंतर ऑक्सिजन लावण्यात आले. आणि मग अतिदक्षता विभागातील बेडला शिफ्ट केले. त्यामुळे मी डॉक्टरांना ही महिलांशी बोलण्याची पद्धत आहे, असे सांगितले.

समज आणि दिलगिरी

दोषी यांच्या वादाची माहिती घेतली आहे. त्यांना समज दिली आहे. कोणतीही गोष्ट एका बाजूने होत नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसवर अनेक डॉक्टर आहेत. गैरवर्तणूक फक्त दोषी यांच्याकडून झालेली नाही. डॉक्टरांनीसुद्धा सौजन्याने वागावे. अधिष्ठात्यांबरोबर याबाबत बोलणे झाले आहे. मी या रूग्णालयातील डॉक्टरांना भेटणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली, तर माझा उद्देश पेशंटला अ‍ॅडमिट करण्याचा होता. त्यातून माझ्याकडून डॉक्टर किंवा स्टाफ यांचे मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करते, असा व्हिडीओ दोषी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

COMMENTS