डेंग्यू नियंत्रणासाठी 9 राज्यांमध्ये केंद्राची आरोग्य पथके दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेंग्यू नियंत्रणासाठी 9 राज्यांमध्ये केंद्राची आरोग्य पथके दाखल

नवी दिल्ली : देशातील विविध भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्

महावितरणच्या गलथानपणामुळे ६० ते ७० एक्कर उस पेटला | LOKNews24
Solapur : ऊसाच्या एकरकमी FRP साठी सोलापुरमध्ये रयत क्रांती संघटनेचा धडक मोर्चा (Video)
सरकारे बदलली तरीही डॉ. दाभोळकरांचे सूत्रधार मोकाट : डॉ. राजेंद्र माने

नवी दिल्ली : देशातील विविध भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तज्ज्ञांची केंद्रीय पथके 9 राज्ये राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या पथकांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी समाविष्ट आहेत. आरोग्य सेवा महासंचालक आणि नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना (आरोग्य) पत्र पाठवण्यात आलं आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाशी निगडित सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी हे पथक काम करतील. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त रुग्ण असलेल्या राज्यांची ओळख पटवून तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला.

COMMENTS