डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार… ‘असा’ घडला थरार… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार… ‘असा’ घडला थरार… (Video)

प्रतिनिधी : अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यावर एका बडतर्फ पोलीस अधिक

खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी
विद्यार्थ्यांना होणार मोफत शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी : अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यावर एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या गोळीबारात मिटके हे बालंबाल बचावले आहेत.

गोळीबार करणाऱ्या या बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांसमवेत पत्रकार परिषद घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी पोलीस खात्यातून एका सहायक निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. या बडतर्फ अधिकाऱ्याच्या विरोधात एका महिलेने गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केला होता.

पीडित महिलेने जबाब दिल्यास अडचणी निर्माण होण्याची भीती असलेल्या या बडतर्फ अधिकाऱ्याने सकाळीच पीडित महिलेच्या घरात घुसून महिला व तिच्या मुलींना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत डांबून ठेवले होते. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे फौजफाट्यासह पीडित महिलेच्या घरी दाखल झाले.

त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी त्या बडतर्फ अधिकाऱ्याने हवेत गोळी झाडली. चर्चेतून मार्ग काढू असे सांगत इतर पोलीस अधिकाऱ्यांनी महिला व तिच्या मुलांना त्याच्या ताब्यातुन सुखरूप बाजूला काढले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी त्या बडतर्फ पोलिसांवर झडप घातली. त्याचवेळी त्याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

COMMENTS