डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी         राहुरी तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागून असलेल्या डॉ.

तरुणीचा पत्ता न सांगितल्याने तिघांकडून एकास बेदम मारहाण
येत्या चार-पाच दिवसांत शाळा उघडण्याचा निर्णय होईल : राजेश टोपे l DAINIK LOKMNTHAN
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात वाचनालय गरजेचे ः स्नेहलता कोल्हे

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी

        राहुरी तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागून असलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची मुळी कधी पडणार ? मात्र डॉ. तनपुरे कारखाना प्रशासनाने कोणालाही कानोकान खबर न करता गळित हंगामची मुळी टाकण्याची लगिन घाई केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमास शासकीय अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी, पञकार यांना बाजुला ठेवून कार्यक्रम उरकुन घेण्यात आला. डॉ. तनपुरे कारखान्याला सहकार खात्याची कारखाना सुरू करण्याची परवानगी व मुदतवाढ नसल्याकारणाने कुठलाही गाजावाजा न करता ५०ते १०० कामगार व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये गळीत हंगाम शुभारंभचा कार्यक्रम पार पडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

            गळीत हंगाम कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे, व्हाईस चेअरमन दत्ताञय ढुस यांच्यासह काही संचालक उपस्थित होते. डॉ. तनपुरे कारखाना राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होते की आपला कारखाना हा कधी सुरू होणार ?मात्र नुकतीच मुळी पडल्याने कारखाना सुरू झाल्याची चर्चा होत आहे.

मुळी टाकण्याच्या कार्यक्रम हा काही  कामगारांनाही माहिती नव्हता? मात्र मोजक्याच कामगारांच्या उपस्थितीत मुळी टाकण्याचा कार्यक्रम उरकण्यात आल्याचीही चर्चा होत आहे.

मुळी टाकण्याचा कार्यक्रम हा छोटीशी विधिवत पूजा करुन संपन्न करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. 

मात्र प्रशासनाने हा कार्यक्रम गुपचिप कोणाला कानो कान खबर न करता तसेच पत्रकारांना न बोलवीता कार्यक्रम घोरण्याचे कारण काय? याची चर्चा होत आहे.

कारखाना व शेतकरी टिकला पाहिजे; मोरे

                  राहुरीची कामधेनू टिकली पाहिजे.कारखाना चालू झालाच पाहिजे.परंतू सत्ताधारी मंडळाने सभासदांचा अंत पाहू नये मागिल वर्षाचे पेमेंट देवून सहकार खात्याकडून रितसर परवानगी घेवून कारखाना सुरु केला पाहिजे होता. सहकार खात्याची परवानगी नसताना कारखान्याचा गळीत हंगाम सुरु केला आहे. सुदैवाने एखादी घटना घडू नये तसे झाल्यास सत्ताधारी संचालक मंडळ जबाबदारी घेणार आहे का?सभासदांनी ऊस पुरवठा केला तर त्या शेतकऱ्यांस एफ.आर.पी.प्रमाणे पेंमेट दिले गेले नाही तर दाद कोणाकडे मागणार संचालक मंडळाने मागिल पेंमेट करुन रितसर परवानगी घ्यावी राहुरीची कामधेनू कायदेशिर मार्गाने चालू करावी.

COMMENTS