ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस पडणार आहे. तर पालघरमध्येही आज म
ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस पडणार आहे. तर पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघरला आज, मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसानं अनेकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नागरिकांना काही महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडण्यास इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागात तुरळक पाऊस तसेच विदर्भामध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्यानं सतर्क राहण्यास सागितलं आहे.
COMMENTS