Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रक टिप्पर ची समोरासमोर धडक,ड्रायव्हर जळून खाक.

ट्रक टिप्पर ची समोरासमोर धडक

 भंडारा-तुमसर (Bhandara-Tumsar) राज्य मार्गावर दोन ट्रक मध्ये भीषण अपघात  घडला. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रक चा चालक जिवंत

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
अमरावतीमध्ये भीषण अपघातात 6 ठार !

 भंडारा-तुमसर (Bhandara-Tumsar) राज्य मार्गावर दोन ट्रक मध्ये भीषण अपघात  घडला. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रक चा चालक जिवंत जळाल्याची दुर्दैवी घटना घडली . भंडारा-तुमसर(Bhandara-Tumsar) राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. दुसऱ्या ट्रकच्या ड्रायव्हर  वेळीच बाहेर निघाल्याने त्याचे प्राण वाचले . मात्र टिप्पर ट्रक चे कॅबिन चेपल्याने ड्रायव्हर अडकून पडला . त्याला बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नव्हता . कोळसा भरलेल्या ट्रकला लागलेली आग टिप्पर ट्रकलाही लागली . बघता बघता आग प्रचंड भडकली. या आगीत टिप्पर मध्ये अडकलेला ड्रायव्हर  जळून खाक झाला . याची माहिती वरठी पोलिसांना( Varaṭhī polic) आणि अग्निशमन दलाला देण्यात आली असून घटनास्थळ गाठत अग्निशमन ( Agniśamana ) दलाला आग विझवण्यात यश आलंय . वरठी पोलिसांकडून या अपघात प्रकरणी अधिक तपास केला जातोय.

भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दोन ट्रक मध्ये भीषण अपघात

COMMENTS