देवळाली प्रवरा : टाकळिमियाँ ग्रामपंचायतीत तब्बल ६९ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ नंदकिशोर जुंदरे, ऍड. रावसाहेब करपे, प्रताप जाधव व गणेश तोडमल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नंदकिशोर जुंदरे यांनी सांगितले की, त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ जुलै २०२४ रोजी तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब गंगाधर निमसे यांना निलंबित करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या गैरव्यवहारात सरपंच लीलाबाई गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांचीही जबाबदारी स्पष्ट झाल्याचे चौकशीत नमूद आहे. नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी केलेल्या दुबार चौकशीत २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षांत मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे उघड झाले आहे. गावात प्रत्यक्षात १६ अंगणवाड्या असताना कागदोपत्री ५० अंगणवाड्या दाखवून सुमारे साडेतीन लाख रुपयांची साहित्य खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच दोन वर्षांत जवळपास १२ लाख रुपयांचा कर न भरल्याची नोंद, शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी प्रत्यक्ष ५० हजारांची पावती असताना तब्बल ५ लाखांचे देयक अदा केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय शवदाहिनी निधीतून ८० हजार रुपयांचा अपहार झाल्याचेही चौकशीत समोर आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील फर्निचर खरेदीत मोठी तफावत आढळून आली असून, प्रत्यक्षात केवळ तीन ग्रामसभा झालेल्या असताना कागदोपत्री सहा ग्रामसभा झाल्याचे दाखविण्यात आले. तसेच आराखडा मंजूर नसतानाही बंदिस्त गटारींच्या कामासाठी ३.२७ लाख व ३.३६ लाख रुपयांची दोन बिले अदा करण्यात आल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी आहे. या सर्व प्रकरणात सरपंच व पदाधिकाऱ्यांना संयुक्तपणे जबाबदार धरणारा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात आला असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषी आढळलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करून तात्काळ पदमुक्त करावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी ठाम मागणी यावेळी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली.

देवळाली प्रवरा : टाकळिमियाँ ग्रामपंचायतीत तब्बल ६९ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ नंदकिशोर जुंदरे, ऍड. रावसाहेब करपे, प्रताप जाधव व गणेश तोडमल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नंदकिशोर जुंदरे यांनी सांगितले की, त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ जुलै २०२४ रोजी तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब गंगाधर निमसे यांना निलंबित करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या गैरव्यवहारात सरपंच लीलाबाई गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांचीही जबाबदारी स्पष्ट झाल्याचे चौकशीत नमूद आहे.
नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी केलेल्या दुबार चौकशीत २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षांत मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे उघड झाले आहे. गावात प्रत्यक्षात १६ अंगणवाड्या असताना कागदोपत्री ५० अंगणवाड्या दाखवून सुमारे साडेतीन लाख रुपयांची साहित्य खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच दोन वर्षांत जवळपास १२ लाख रुपयांचा कर न भरल्याची नोंद, शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी प्रत्यक्ष ५० हजारांची पावती असताना तब्बल ५ लाखांचे देयक अदा केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय शवदाहिनी निधीतून ८० हजार रुपयांचा अपहार झाल्याचेही चौकशीत समोर आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातील फर्निचर खरेदीत मोठी तफावत आढळून आली असून, प्रत्यक्षात केवळ तीन ग्रामसभा झालेल्या असताना कागदोपत्री सहा ग्रामसभा झाल्याचे दाखविण्यात आले. तसेच आराखडा मंजूर नसतानाही बंदिस्त गटारींच्या कामासाठी ३.२७ लाख व ३.३६ लाख रुपयांची दोन बिले अदा करण्यात आल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी आहे.
या सर्व प्रकरणात सरपंच व पदाधिकाऱ्यांना संयुक्तपणे जबाबदार धरणारा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात आला असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोषी आढळलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करून तात्काळ पदमुक्त करावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी ठाम मागणी यावेळी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली.

COMMENTS