
यासंदर्भातील माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या त्राल भागात काही दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. या आधारावर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी नागबिरानच्या जंगलात मोहीम हाती घेतली. जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि चकमक झडली. यात तीन दहशतवादी ठार झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. त्यांचे आणखीही काही साथीदार या भागात लपले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी जंगलात विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. जवानांची अतिरिक्त कुमकही रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.
COMMENTS