जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण .

तरुणाचा ओढ्याच्या पाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

सध्या एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीवरून ,गस्तीवर असताना पोलीस शिपाई सद्दाम शेख (Saddam Sheikh) आणि अजित पोकरे(Ajit Pokar

Ahmednagar : नगर जिल्ह्यातील या शाळा राहणार चालू | LOKNews24
अखेर राजधानीतील प्रदूषण घटले
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने केज तालुक्यातील येवता येथे युरिया खताची सुरळीत वाटप

सध्या एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीवरून ,गस्तीवर असताना पोलीस शिपाई सद्दाम शेख (Saddam Sheikh) आणि अजित पोकरे(Ajit Pokare) यांना एक तरुण ओढ्याच्या पाण्यात आत्महत्येचा प्रयत्न असल्याची खबर मिळाली . दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता बागुल उद्यान(Bagul Garden) जवळ असलेल्या ओढ्याजवळ पोहोचले. सद्दाम शेख(Saddam Sheikh) यांनी ओढ्यात असलेल्या तरुणाला पाण्यात उतरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . परंतु त्या तरुणाने त्यांना न जुमानता त्यांना धक्का देऊन पाण्यात उडी मारली पाठोपाठ सद्दाम यांनी देखील ओढ्यामध्ये उडी मारली . ओढा जवळपास १० फूट खोल असल्याचे सांगण्यात आले . शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला ओढ्याच्या कडेला ओढत आणले आणि त्याचे प्राण वाचवले . हे घडत असताना परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती , सद्दाम शेख यांच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले आणि सुटकेचा निश्वास टाकला .

COMMENTS