जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका… अजित पवारांनी सांगितले, एकत्रित लढणार की स्वतंत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका… अजित पवारांनी सांगितले, एकत्रित लढणार की स्वतंत्र

प्रतिनिधी : मुंबई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.  महाविकास

सुक्ष्म आणि लहान, आता ते काय निधी देणार आहेत? l LokNews24
जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार : अजित पवारांची टीका
पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करा : अजित पवार

प्रतिनिधी : मुंबई

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असून, राष्ट्रवादीही स्वबळाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

काल पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तसे संकेत दिले होते. राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. 

त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत मत व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी होणार की नाही, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, जिल्हापातळीवर राजकीय परिस्थिती वेगळी असते. 

त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांना अधिकार द्यावा. एकट्याने लढवायची की आघाडी करून लढायची हा निर्णय जिल्हापातळीवर व्हावा. 

जिल्हापातळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला यश मिळेल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी निर्णय घ्यावा, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, या बैठकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेल्या सदस्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी लागणारा शासन निधी मिळताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. 

राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने पक्षाच्यावतीने सर्वांची समजूत काढण्यात आली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. 

त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेना वा काही ठिकाणी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष असे चित्र होते. 

त्यामुळे वरिष्ठ पातळीवर राजकीय समीकरणं बदलली असली तरी स्थानिक पातळीवर जो समन्वय साधायला हवा तो अजून दिसून येत नसल्याचे मत अजित पवार यांनी मांडले.

COMMENTS