जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख अचानक सोनईत दाखल

Homeताज्या बातम्याअहमदनगर

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख अचानक सोनईत दाखल

      तीन दुकाने सील,सहा जणावर कारवाई, मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी ( ५ रोजी) सकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस

जरे हत्याकांडातील आरोपीचा जामीन फेटाळला
कन्हैय्या कुमार यांनी अमित शाह यांच्यावर साधला निशाणा | ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | LokNews24
पोलिस ठाणे आणि न्यायालयाच्याआवारातूनच दुचाकीची चोरी

      तीन दुकाने सील,सहा जणावर कारवाई,
मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी ( ५ रोजी) सकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे त्यांच्या ताफ्यातून सोनई वरून शिर्डी येथे एका बैठकीला जात असताना अचानक बस स्थानकाच्या परिसरात ताफा थांबवून ज्या दुकानात व्यावसायिक व ग्राहकांच्या   तोंडाला मास्क नाही अश्यावर कारवाई करून सहा दुकाने सील करण्यात आले आहे, तसेच गावात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ५ हजाराची दंडात्मक कारवाई केली आहे.  सोबत असलेल्या अधिकारी यांनी काहींची धुलाई सुद्धा केली.त्यामूळे नागरिकांची एकच धांदल उडाली होती.  विनामास्क नागरिकांवर ५ हजाराची दंडात्मक कारवाई.    

   कोरोनाची तिसरी लाट नगर या जिल्ह्यातून होणार अशी भाकीत असल्याने जिल्हाधिकारी भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे प्रत्येक गावातील अपडेट जाणून घेत असताना स्थानिक प्रशासन या कामी कमी पडले आहे, असे काल सोनाईत निदर्शनास आले. याकडे कोणीही नियम,अथवा काळजी घेत नसल्याने स्वतःहा अधिकाऱ्यांनी  दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या,व तसेच ज्याच्या तोंडावर मास नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची हालचाल स्थानिक प्रशासन मार्फत चालू होती.या ठिकाणी सर्व काही बिनधास्त आलबेल चालू असल्याचे चित्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अनुभवले.   

  दरम्यान नेवासा तालुक्यातील काही गावात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहेत, त्यामुळे सतर्कतेचा इशारा शासन स्तरावरील वेळोवेळी देत आहेत, तरीही नागरिक स्वतःहा काळजी घेताना दिसून न आल्याने तालुक्यातील चांदा हे गावात कोरोनाचे १३ रुग्ण आढळून आल्याने कालपासून तहसीलदार रुपेश सुराणा, चांदे गावचे उपसरपंच चांगदेव महाराज दहातोंडे व शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठित लोक एकत्र येऊन अत्यावश्यक दुकाने वगळता गाव बंद करण्याचे आवाहन करून १४ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.

COMMENTS