जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी!

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतीचा ‘जाच’ कायम आहे. कायदा, पोलीस प्रशासन  असल्यावर देखील या राज्यात एका स्त्रीला न

शाक्तपंथी छत्रपती संभाजी महाराज ! 
राष्ट्रीय दर्जा का गेला ? 
साहित्याचा निष्णात मार्गदर्शक हरपला ! 

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतीचा ‘जाच’ कायम आहे. कायदा, पोलीस प्रशासन  असल्यावर देखील या राज्यात एका स्त्रीला नग्न करुन तिला विष्ठा खाण्यास भाग पाडले जाते. जाती अंताची लढाई अधिक परिणामकारक करायाची असेल तर  असेल   अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यापेक्षाही   अत्यंत कठोर कायद्यांची निर्मिती करणे काळाची गरज बनली आहे.अंधश्रध्दा निमुलनासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ.नरेन्द्र दाभोलकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं,अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या सैतानी बुध्दीवाद्यांनी शेवटी त्यांचाही खुन केला.

राज्यात नरबळीच्या बातम्या अजूनही प्रसार माध्यमातुन सनसनी म्हणून झळकतात. अपत्य नसलेल्या स्त्रीला वांझोटी समजून तिचा अनन्वीत छळ केला जातो. तिचा तिरस्कार केला जातो. विधवा स्त्रीला अपशकूनी पांढऱ्या  पायाची अशी दुषणे लावली जातात. शुभ कार्यात तिला बाजूला सारले जाते. देवीला कोबंडया, बकर्‍याची बळी दिला जातो. अंगात देवी येणे, भूतारकी, चुडेल, यासारखे प्रकार सर्रास सुरु आहे. धागे, दोरे तावीज, गंडे बांधणे, मत्रंरलेल्या पाण्याने आंघोळ करणे. निंबु, मिरची बांधणे, मांजर आडवी गेली तरी माघारी फिरणे, पैशांचा पाऊस पाडणे, काळी मांजर, मांडुळ साप, कासव, याची तस्करी यासारखे प्रकार महाराष्ट्रासारख्या  राज्यात सुरु आहेत. नक्षलवाद, कुपोषण, महिलांचे आरोग्य, या सारख्या गंभिर समस्या आणि आजाराची गंभिरता आमच्या या राज्यात आहे. त्यातही आदिवासी भागातील अंधश्रध्दा, शिक्षणाचे प्रमाण, विवाहाचे वय चितेंचे आणि चितंनाचे विषय आहेत. या सर्व समस्या कायम असतांना जात पंचायतीच्या मानवतेला काळीमा फासणार्‍या घटना सातत्याने घडत असतात. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार या राज्यासह महाराष्ट्रात देखील जात पंचायतीने निर्णय कायम गाजत राहतात. इतर राज्यामध्ये ‘खाप’ पंचायत म्हणून विशिष्ट समाजामध्ये त्यांचे प्राबल्य आजही आहे. महाराष्ट्रात जात पंचायत म्हणून समाजातील पंच त्या जातीत घडलेल्या घटनांवर निर्णय घेत असतात. उस्मानाबाद, तालुक्यातील सांगा येथील एका दांपत्याने विष प्राशन करुन आमचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला. पत्नी बचावली आहे. पती गेल्याचा मानसिक धक्का तिला बसला आहे. या घटनेने कथानक अंगावर रोमांच उभे करणारे आहे. मृत्यू पावलेल्या सोमनाथवर मेहुनीशी अनैतिक संबधाचा आरोप जात पंचायतीने लावला. आणि त्याला शिक्षा म्हणून दोन लाखाचा दंड ठोठावण्यात आला. सागां सारख्या लहानशा पारधी समाजाच्या वस्तीत चोरुन लपून जात पंचायतीची बैठक घेण्यात आली. दोन लाख दंडापोटी सोमनाथने विस हजार रुपये भरले. परंतुू उर्वरित रक्कम भरण्यास तो असमर्थ ठरला. पंचायतीने पैशांसाठी सोमनाथ मागे तगादा लावला. 18 सप्टेंबर रोजी पुन्हा पंचायत बसविण्यात आली. मेहुणीशी अनैतिक संबंध आणि अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप पून्हा करण्यात आला. सोमनाथला विष्ठा खाण्यास भाग पाडले. तर सुनीताला नग्न करुन तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ आणि सुनिताने जात पंचायतीच्या जाचातुन सुटका करुन घेण्यासाठी विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला. विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला. विष प्राशनात सोमनाथचा मृत्यू झाला. परंतु सुनिताचे प्राण वाचले. सुनिताने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर जात पंचायतीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु यातुन सुनिताची सुटका होईल असे वाटत नाही. या राज्यात अधंश्रध्दा निर्मुलन समितीने जातपंचायती विरोधात अभिमान राबविले गेले. डॉ. नरेन्द्र दाभोलकरांनी  जातपंचायती विरोधात लढा खुप आधीपासून सुरु केला होता. त्यानंतर 2017 मध्ये राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधात कायदा तयार केला आहे. जातपंचायत विरोधात कायदा तयार केला आहे. जातपंचायत मुठमाती अभियानांतर्गत 17 जातपंचायती बंद करण्यात आल्यात. अशा विविवृ घटनांमध्ये आतापर्यंत104 गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही अशा प्रकाराच्या घटना बंद होत नाहीत. यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहेच. पण केवळ कायद्याने  जाती अशा घटनांना थोपवणे कितपत शक्य होईल? त्या संबधित समाजातील तरुण पिढीने याबाबत पुढाकार घेवून समाज जागृती करण्याची गरज आहे.जात पंचायतींच्या वेठबिगारीत अडकलेला एक घटक या जोखडातून बाहेर काढण्याची जबाबदारी युवा महाराष्ट्रावरच आहे. . 

COMMENTS