जम्मू काश्मीरमध्ये 14 व्या दिवशीही चकमक सुरूच ; 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

जम्मू काश्मीरमध्ये 14 व्या दिवशीही चकमक सुरूच ; 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीर खोर्‍यात गेल्या 14 दिवसांपासून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असून, आतापर्यंत 9 जवान शहीद झाले आहेत. तर स्थानिक नागर

खाजगी पेट्रोलियम कंपन्यांचा देशहिताकडे कानाडोळा !
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!
वर्ध्यात चणा खरेदीला सुरवात

श्रीनगर : जम्मू-काश्मीर खोर्‍यात गेल्या 14 दिवसांपासून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असून, आतापर्यंत 9 जवान शहीद झाले आहेत. तर स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी देखील सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती.
या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, क्रॉस फायरिंगमध्ये एक काश्मीरी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर, चकमकीत एक दहशतवादीही जखमी झाल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये झाली. तुरुंगातील पाकिस्तानी दहशतवादी झिया मुस्तफाला दहशतवाद्यांचा अड्डा ओळखण्यासाठी भटादुरियन येथे नेण्यात आले होते, तेव्हा इतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही फायरिंग सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्कराचा एक जवान आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या चकमकीत दहशतवादी झिया मुस्तफाही जखमी झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सध्या जखमी जवानांवर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या कारवाईनंतर सुरक्षा दलाने तपास अभियान वाढवले असून, संपूर्ण परिसराचा घेराव घालत दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS