नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेसाठी मतदानानंतर मंगळवारी मतमोजणी करण्यात आली. या निकालात मतदानोत्तर चाचण्यांचा अ
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेसाठी मतदानानंतर मंगळवारी मतमोजणी करण्यात आली. या निकालात मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज फोल ठरवत हरियाणामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत काँगे्रसवर मात करत तिसर्यांदा कमख फुलवण्यात भाजप यशस्वी झाली आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये भाजपला हार पत्करावी लागली असून काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांचा देखील पराभव पत्करावा लागला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. निकालाआधी जवळपास सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये इंडिया आघाडीच्या बाजुने कौल देण्यात आला होता, तर भाजपला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मतदानोत्तर चाचण्याचे अंदाज खरे ठरले आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने 42 व काँग्रेसने 6 जागा जिंकल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये काँगे्रस आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण आघाडीला 48 जागा मिळाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सला 42 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या.भाजपने 29 जागा जिंकल्या. पीडीपीला 3 जागा मिळाल्या. प्रत्येकी एक जागा आम आदमी पार्टी, जेपीसी आणि माकपला गेली. 7 अपक्षही विजयी झाले. 90 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले- ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील. ओमर अब्दुल्ला यांनी दोन जागांवर (बडगाम आणि गंदरबल) निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या. तर दुसरीकडे हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीसे अनपेक्षित लागले आहेत. मतमोजणी सुरू झाली तेव्हा काँग्रेस आघाडीवर होती, मात्र काही तासांतच भाजपने आघाडी घेत एकतर्फी सत्ता मिळवत चित्र पालटून टाकले आहे.
हरियाणात भाजप 48 जागांवर विजय मिळवला असून काँगे्रस केवळ 37 जागांवर अडकली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा संपूर्ण निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत होते आणि काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी डझनभर सभा, विजय संकल्प यात्रा काढल्या होत्या. याशिवाय राज्यात शेतकरी, जवान आणि पैलवानांच्या नाराजीचे कथानक काँग्रेसकडून चालवले जात होते. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. तर दुसरीकडे हरियाणाच्या निवडणुकीचे सूत्र भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी हाती घेत लाडकी बहीण योजना, अग्नीवीर योजनेचा जोरदार प्रचार करत आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत सत्ता काँगे्रसच्या हातून खेचून आणली. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या 7 महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खरे तर भाजपने 2019 मध्येही खट्टर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले. 2024 मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे निवडणुकीच्या 7 महिने आधी खट्टर यांना हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली. सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवली आणि एका नव्या चेहर्याने जनतेसमोर हजर झाले. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
विनेश फोगाटने भाजपच्या उमेदवाराला केले चीतपट
कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली आहे. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे.जुलाना मतदारसंघात विनेश फोगाट आणि योगेश बैरागी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या चार फेर्यांमध्ये विनेश फोगाट योगेश बैरागी यांच्यापेक्षा पिछाडीवर होती. पण पुढील सर्व मतमोजणीच्या फेरीत विनेश फोगाट आघाडीवर राहिली आणि विजयी झाली.
मेहबूबा मुक्ती यांचा पराभव
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्या म्हणाल्या- लोकांचा निर्णय मला मान्य आहे. दुसरीकडे, नौशेरा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर रविंदर रैना यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
हरियाणा विधानसभा 90
भाजप- 48
काँगे्रस- 37
इतर – 5
जम्मू-काश्मीर विधानसभा -90
नॅशन कॉन्फरन्स -42
काँगे्रस- 6
भाजप-29
पीडीपी- 3
इतर -10
COMMENTS