जम्मू कश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा; दोन रॉकेट लॉन्चरसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जम्मू कश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा; दोन रॉकेट लॉन्चरसह मोठा शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर/प्रतिनिधी : देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दहशतवादी ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना

छत्रपतींच्या कोणत्या इतिहासाशी बांधिलकी, हे राजकीय पक्षांनी जाहीर करावे!
प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल
बोल्हेगाव, नागपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट… नागरिक आक्रमक…

श्रीनगर/प्रतिनिधी : देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दहशतवादी ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याचपार्श्‍वभूमीवी सुरक्षा दलाला जम्मू कसश्मीरमध्ये मोठे यश मिळाले आहे. जम्मू कश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच दहशतवाद्यांकडून रॉकेट लॉन्चरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळल्याने त्यांचा घातपाताचा कट असल्याची शक्यता आहे. त्यांचा खात्मा करण्यात आल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने खात्मा केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी आहे. या दहशतवाद्यांकडून रॉकेट लॉन्चरसह ,रॉकेट आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी याचा वापर हायवेवर करत मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांचा खात्मा करत संभाव्य घातपात रोखण्यात यश मिळवले आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांकडून घडवण्यात येणारा संभाव्य घातपात टाळण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. सुरक्षा दलाचे हे मोठे यश आहे. या चकमकीत दोन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. कुलगाममध्ये गुरुवारी दुपारी बीएसएफच्या जवानाच्या वाहनांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर जम्मू कश्मीर पोलीस, सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत कारवाईला सुरुवात केली होती. त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरुवात झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा करत मोठे यश मिळवले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

COMMENTS