जगभरात लसींचा पुरवठा करण्याचं अमेरिकेने केलं जाहीर ; पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगभरात लसींचा पुरवठा करण्याचं अमेरिकेने केलं जाहीर ; पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात गुरूवारी 3 जून रोजी दूरध्वनीवरून चर्चा झाली.

बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त 16 फेब्रुवारी रोजी संगमनेरमध्ये महानोकरी मेळावा
दुधाची दरवाढ, कांदा निर्यात बंदीविरोधात आंदोलन
महाआरतीच्या कावड मिरवणुकीत लक्षवेधी अघोरी नृत्य

नवी दिल्ली, : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात गुरूवारी 3 जून रोजी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे चर्चेसंदर्भात माहिती दिली. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली, त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत ट्वीटही केलेय. सध्या मोदींचं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “काही वेळापूर्वीचं कमला हॅरिस यांच्यासोबत चर्चा झाली. जगभरात लसींचा पुरवठा करण्याचं अमेरिकेने जाहीर केलं आहे. त्यामुळे मी त्यांचं कौतुक करतो. त्याचप्रमाणे अमेरिकन सरकार, व्यवसायिक, उद्योजक आणि प्रवासी भारतीयांनी मिळालेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात नमूद केलेय. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष जो बायडेन यांनी भारतासह आशियाच्या बर्‍याच देशांना लसींचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केलेय. भारत व्यतिरिक्त आशिया खंडातील नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव, मलेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, लाओस, पापुआ न्यू गिनी आणि तैवान या देशांमध्ये लस देण्यात येणार आहे.

COMMENTS