छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार धारेवर राज्य शासनाचे काम : ना. बाळासाहेब पाटील

Homeमहाराष्ट्रसातारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार धारेवर राज्य शासनाचे काम : ना. बाळासाहेब पाटील

शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन व स्वराज्य गुढीस श्रीफळ वाढवून जिल्हा परिषदेच्यावतीने शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Nashik : इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेचा बैलगाडी मोर्चा (Video)
वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट
पवारांनीच महाराष्ट्रातील घरं फोडली  


जिल्हा परिषदेच्यावतीने शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा

सातारा / प्रतिनिधी : शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन व स्वराज्य गुढीस श्रीफळ वाढवून जिल्हा परिषदेच्यावतीने शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज झालेल्या शिवस्वराज्य दिन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरच राज्य शासनाचे काम

राज्य शासनाने 6 जून हा दिवस शिव स्वराज्य दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्यात हा दिन साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगवडावर शिवराज्याभिषेक झाला. त्यांनी संर्घषातून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारधारवेरच राज्य शासनाचे काम सुरु असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.

या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी गुरुदत्त काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

COMMENTS