छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

नगर -  सभासद बंधू भगिनी व संघटना हेच खरे छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे आधारस्तंभ व मालक असल्याने त्यांचे हित जोपासून उत्कर्षाकडे वाटचाल

खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे
विजेच्या पोलवर दिव्यांऐवजी पेटल्या मशाली
जरे हत्याकांडातील आरोपीचा जामीन फेटाळला

नगर – 

सभासद बंधू भगिनी व संघटना हेच खरे छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे आधारस्तंभ व मालक असल्याने त्यांचे हित जोपासून उत्कर्षाकडे वाटचाल करणे हेच उद्दिष्ट पतसंस्थेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी केले.

नगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या तपोवन रोडवरील बहुउद्देशीय नियोजित इमारतीच्या जागेचे भूमिपूजन पतसंस्थेच्या सभासदांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संचालक सभासद जयराम ठुबे – सौ.मीनाताई ठुबे, सूर्यभान सौदागर-सौ. साधना सौदागर, ज्ञानदेव अडसुरे – सौ.अर्चना अडसुरे, सुनील तांदळे – सौ. विद्या तांदळे, राजाराम ठुबे – सौ.सुनीता ठुबे या दाम्पत्यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. तर उपस्थित सभासदांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ टाकून भूमिपूजन करण्यात आले.    

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत तापकीर,नियोजित इमारतीचे रचनाकार नगर येथील ऑर्किटेकट दत्तात्रय शेळके, ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव भगत, माजी अध्यक्ष चंद्रकांत खाडे, माजी अध्यक्ष संभाजी निमसे, लेखापरीक्षक दत्तात्रय बोंबले, विस्तार अधिकारी विठ्ठलराव गोरे, विस्तार अधिकारी मनोज बनकर, देवगड संस्थान प्रतिनिधी बाबासाहेब वरखडे,विस्तार अधिकारी भाऊसाहेब रासकर,सहायक गटविकास अधिकारी दादासाहेब शेळके यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना अध्यक्ष सुदामराव बनसोडे म्हणाले की पतसंस्थेची इमारत ही बहुउद्देशीय असून संघटना व संस्था या दोघांच्या ही मालकीची व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांची आठवण करून देणारी आकर्षक अशी इमारत रहाणार आहे.यामध्ये खालच्या मजल्यावर सभागृह सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी उपलब्ध असेल दुसर्‍या मजल्यावर संस्थेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने बाल्कनीयुक्त मंगल कार्यालय रहाणार असून अतिथी गृहासह शिक्षण घेत असलेल्या सभासदाच्या मुलांसाठी ही निवासी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगत सभासदांचे हित व सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पतसंस्थेला उत्कर्षाकडे नेण्याचा आपला प्रयत्न रहाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

यावेळी पतसंस्थेचे संचालक अशोकराव जगदाळे यांनी उपस्थित संचालक सभासदांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.उपस्थित मान्यवरांचा पतसंस्थेची वार्षिक अहवाल पुस्तिका व गुलाबपुष्प देऊन यावेळी गौरव करण्यात आला.सभासदांच्या वतीने चंद्रकांत खाडे, ज्ञानदेव शिंदे, सुनील काळे,ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव भगत, श्री.नेव्हल,मानद सचिव चंद्रकांत तापकीर यांनी मनोगत व्यक्त करत पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

     यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संचालक दादासाहेब डौले, प्रमोद कानडे,सुरेश खरड, प्रशांत सातपूते,राजेंद्र बागले,रामदास जाधव,जयराम ठुबे,संजय गवळी, सुरेश मंडलिक,अरुण गाढवे,संजय गि-हे,सुरेश मंडलिक, सुनीता बर्वे,बाळासाहेब मेहेत्रे, अर्चना कडू, अशोक जगदाळे, सुभाष गोसावी या संचालकांसह सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक राजेंद्र शेडाळे, पवन घिगे, सुरेश निनावे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड  यांनी केले तर आभार चंद्रकांत तापकिर यांनी मानले.

COMMENTS