चोर समजून मारहाण, परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोर समजून मारहाण, परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

संशयितरित्या फिरणार्‍या परप्रांतीयास चोर समजून नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पाथर्डी तालुक्यातील उद्योजकाला खंडणीची मागणी
वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या : सनी वाघ
सद्गुणी, सेवाभावी माणसांच्या सहवासामुळे जीवनाचे सोने होते

अहमदनगर/प्रतिनिधी- संशयितरित्या फिरणार्‍या परप्रांतीयास चोर समजून नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील 28 चारी रोड, शिंगणापूर तालुका कोपरगाव येथे घडली. 

याबाबतची माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर 28 चारी रोड शिंगणापूर  येथे फिरणार्‍या वासुदेव तुफान माडी (वय 40, राहणार बालोरिया दक्षिण दिनाजपूर, पश्‍चिम बंगाल) या परप्रांतीयास परिसरात फिरताना पाहून तेथील नागरिकांना तो चोर असल्याचा संशय आला. यावरून नागरिकांनी त्यास पकडले व चोर समजून त्यास लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत वासुदेव माडी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र श्रावण संवत्सरकर, अमोल विठ्ठल संवत्सरकर, बापू गोरख संवत्सरकर, सुरेश पांडूरंग दादरे (सर्व राहणार 28 चारी रोड शिंगणापूर, कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देसले करीत आहेत.

COMMENTS