चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर कोणतेही डाग नसतात. चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आह
चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर कोणतेही डाग नसतात. चेहर्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे काळे डाग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने किती प्रभावी आहेत, हे तुमच्या त्वचेवर अवलंबून आहे. मात्र तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून चेहर्यावरील काळे डाग कमी करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात हे आयुर्वेदिक उपाय काय आहेत.

१. दूध, काकडी आणि लिंबाचा फेस पॅक लावा
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी दूध, काकडी आणि लिंबाचा रस खूप प्रभावी आहे. एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे दूध आणि एक चमचा काकडीचा रस घेऊन ते चांगले मिसळा. आठवड्यातून तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. याच्या वापराने चेहऱ्यावरील डाग दूर होतील, याशिवाय चेहऱ्यावर चमकही येईल.

आठवड्यातून तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.
२. दूध आणि हळद फेस पॅक लावा
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही दूध(Milk) आणि हळदी(Turmeric) चा पॅकही लावू शकता. आपली त्वचा संवेदनशील असली तरी हळद आणि दुधाचा पॅक खूप गुणकारी आहे. कारण कच्चा दुधात पोटॅशियम(Potassium), मॅग्नेशियम(Magnesium), सेलेनियम(Selenium), लॅक्टिक ऍसिड(Lactic acid), प्रोटीन(Protein), कॅल्शियम,(Calcium) हे जीवनसत्त्वे आढळतात. तर हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दुधात थोडी हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. या आयुर्वेदिक पॅक तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहरा सुंदर होईल.

३. कोरफड वापरा
औषधी गुणधर्मांनी समृद्ध कोरफड(Aloe) त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्वचेवर वापरण्यासाठी प्रथम कोरफडीचे पान घ्या आणि ते कापून घ्या आणि त्यातील गर चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज करा, तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारेल, तसेच त्वचेवरील डागही दूर होतील.

COMMENTS