चिकनसह मटणाचे दर वाढल्याने खवय्यांच्या तोंडचे पळाले पाणी

Homeमहाराष्ट्रसातारा

चिकनसह मटणाचे दर वाढल्याने खवय्यांच्या तोंडचे पळाले पाणी

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मांसाहारी खवय्यांनी मार्चमध्ये चिकनकडे पाठ फिरविली. मातीमोल दराने कोंबड्यांची विक्री झाली.

राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
कसब्यात 45 तर, चिंचवडमध्ये 41 टक्के मतदान
‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टीची सर्वोच्च न्यायालयात धाव

पांचगणी / वार्ताहर : कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मांसाहारी खवय्यांनी मार्चमध्ये चिकनकडे पाठ फिरविली. मातीमोल दराने कोंबड्यांची विक्री झाली. काही शेतकर्‍यांनी तर कोंबड्या पुरल्या, जंगलात सोडून दिल्या. आता तेच चिकन भाव खाऊ लागले आहे. लॉकडाऊपुर्वी व आता चिकनच्या दरात जवळपास 60 ते 80 रुपयांची वाढ झाली आहे. चिकनचे दर वाढल्याने मांसाहारी खवय्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. शाकाहारी अन्नातून रोग प्रतिकार शक्ती वाढते. या शिवाय मांसाहारी पदार्थांमधून रोग प्रतिकार शक्ती आणि जिभेचे चोचले पुरविले जात असल्याने मांसाहारी खवय्यांचा अंडी, मटण, मासे, चिकन याकडे अधिक ओढा असतो. लॉकडाऊनमुळे रिकामाला झालेला असताना वाढीव दराची झळ खवय्यांना सोसावी लागत आहे. 

सध्या चिकनचे दर 230 ते 250 रुपयांपर्यंत आहेत. लॉकडाऊनपूर्वी हे दर 140 ते 180 रुपयांपर्यंत होते. मटणाच्या दरातही वीस ते तीस रुपयांची वाढ झाली आहे. सध्या मटण सहाशे ते 640 रुपये किलोपर्यंत आहे. अंड्याच्या दरातही काही ठिकाणी पन्नास पैशांची तर काही ठिकाणी एक रुपयांची वाढ झाली आहे. मांसाहारी खवय्यांना वाढीव दरामुळे व रिकामा झालेल्या खिशामुळे मांसाहारी खाण्याच्या मोहावर आवर घालावा लागत आहे. 

ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे आठवडे बाजारातून मिळणारे देशी कोंबड्या, गावरान अंडी पांचगणी शहरात येण्याचे प्रमाण घटले.

COMMENTS