चक्क ! पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेव गेला लग्नाला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क ! पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेव गेला लग्नाला.

सात किलोमीटरचा प्रवास करून नवरदेव पोहचला लग्न स्थळी

नांदेड प्रतिनिधी- लोकं आणि लोकांच्या लग्नातली मजा! उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी तर ही गोष्ट…गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात चांगलाच पाऊ

औरंगाबादमध्ये उभारणार पहिले महिला कृषी महाविद्यालय
राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी
साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना जामीन

नांदेड प्रतिनिधी- लोकं आणि लोकांच्या लग्नातली मजा! उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी तर ही गोष्ट…गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात चांगलाच पाऊस पडतोय. या धो धो पावसाने सगळ्यांचेच हाल झालेत. नांदेड (Nanded) मध्ये प्रचंड पाऊस झालाय. या पावसाने पूरस्थिती तयार झालीये. दरम्यान सध्या बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. कधी टेम्पोच काय चालता चालता वाहून गेला, कधी काय तर कधी काय. पण हा व्हिडीओ जरा हटके आहे. ह्यातली माणसं एकदम ओक्के मधी थर्माकॉलवर  बसलीत आणि लग्नसाठी निघालीत. विशेष म्हणजे ह्यात नवरदेव सुद्धा आहे! करोडी ते चिंचोली(Crore to Chincholi) असा सात किलोमीटरचा प्रवास थर्माकोलचच्या होड्यांवर( thermocouple vessels) करून हा पठ्ठा लग्न स्थळी पोहचला.

COMMENTS