चंद्रकांत पाटील पुण्यात आले अन् महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला… राष्ट्रवादीचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत पाटील पुण्यात आले अन् महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला… राष्ट्रवादीचा आरोप

पुणे : प्रतिनिधीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. पालिकेतील सभागृहनेते आणि स्थाय

नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा अपघात, 43 प्रवासी जखमी
जुळया बहिणीं सोबत लग्न करणारा युवक अडकला कायद्याच्या बेडीत
अजय देवगणसोबत लिफ्ट न वापरता करतो पायऱ्यांचाच वापर

पुणे : प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. पालिकेतील सभागृहनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पदे ही टेंडर काढून वाटण्यात आली आहेत. पुणे लुटण्याचे काम भाजपकडुन केले जात आहे.

त्यामुळे महापालिकेतील निविदा आणि पाटील यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत बहुउद्देशीय कामगार पुरवण्याचे 41 कोटींच्या निविदेला मान्यता मिळाली आहे. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थायी समितीचे सदस्य नंदा लोणकर आणि बंडू गायकवाड उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघामधून निवडूण आल्यानंतर , महापलिकेत मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार वाढला आहे. महापालिकेतील विविध पदे ही टेंडर काढून वाटली जातत. त्यामुळे याची सर्व यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी विविध संस्थांकडे करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले असताना सुध्दा महापालिकेने 41 कोटींची निविदा या कंपनीला दिली आहे. दिर्घ मुदतीसाठी कामे देणे, जागा ताब्यात आल्या नसताना निविदा प्रक्रिया राबवणे. बेहिशेबी खर्च केला जात आहे.

भाजपकडुन पुणेकरांची दिशाभुल केली जात त्यामुळे याविषयी आम्ही नगरविकास खात्याकडे तक्रार करणार आहे. सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या निविदेला सुध्दा फेरविचार देणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

COMMENTS