चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजता येणार नाही… त्यांनी राज्यात १०५ आमदार निवडून आणले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजता येणार नाही… त्यांनी राज्यात १०५ आमदार निवडून आणले…

प्रतिनिधी : दिल्ली दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले ‘चंद्रकांतदादा हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्याबद्द

समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)
चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक
काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)

प्रतिनिधी : दिल्ली

दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले ‘चंद्रकांतदादा हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्याबद्दल शिवसेनेने केलेली भाषा ही ‘त्यांची भाषा’ आहे. 

पण प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादांनी राजकारणात केलेले काम आणि पक्षाला मिळवून दिलेले यश विसरता येणार नाही. त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपाचे १०५ आमदार राज्यात निवडून आले आहेत, हे शिवसेनेने विसरू नये.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची औकात सव्वा रुपयांची आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री 

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) उत्तर दिले ‘चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजू नका, त्यांनी राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडून आणलेत.’

चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात लढवलेल्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या अशा सर्वच निवडणुकीत भाजपा नंबर एकवर राहिला आहे, असा दावाही दानवे यांनी केला.

COMMENTS