साताऱ्यात पोगरवाडीला जाणाऱ्या घाटात एसटी बसच्या पाठीमागील बाजूस धोकादायक पद्धतीने लटकून एक तरुण प्रवास करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आ
साताऱ्यात पोगरवाडीला जाणाऱ्या घाटात एसटी बसच्या पाठीमागील बाजूस धोकादायक पद्धतीने लटकून एक तरुण प्रवास करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एका अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या या हुल्लडबाज तरूणांवर प्रशिक्षकाचे नियंत्रण नसल्याने जीवघेणे स्टंट प्रशिक्षणार्थीकडून केले जात आहेत. याबाबतची माहिती अशी, पोगरवाडी येथील करिअर अकॅडमी पोलीस(Career Academy Police) आणि आर्मी भरती(Army Recruitment) साठी मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या मार्गावरच घाटातून आणि रस्त्यावर प्रशिक्षणार्थी मुले धावत असतात. भर पावसात रस्त्यावर हे युवक अत्यंत धोकादायक पद्धतीने धावत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या हुल्लडबाज प्रशिणार्थी मुलांवर प्रशिक्षकाचे लक्ष नसल्यानेच हे धोकादायक उद्योग ही मुले करत आहेत . सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
COMMENTS