घरगुती वादातून मुलाने केला आजोबांच्या मदतीने बापाचा खून

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

घरगुती वादातून मुलाने केला आजोबांच्या मदतीने बापाचा खून

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम या ५१ वर्षीय इसमाचा त्याचाच मुलाने आजोबांच्या मदतीने खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

आमदार निलेश लंके अडचणीत… अधिकाऱ्यांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार… I LOK News24
नगर अर्बन सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंसह त्यांच्या चुलतीला वॉरंट
धनादेश न वटल्याप्रकरणी कर्जदारास तीन महिने शिक्षा व पंधरा लाखाचा दंड

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम या ५१ वर्षीय इसमाचा त्याचाच मुलाने आजोबांच्या मदतीने खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,लताबाई बाबुराव निकम या महिलेने कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या फिर्यादी नुसार सावत्र मुलगा सोनू उर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व त्याचा आई चे वडील सोपान लक्ष्मण कोपरे रा सुरेगाव व  माझे मयत पती बाबुराव निकम यांच्यात कायम छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होत असे याचाच राग मनात धरून आरोपी सोनू उर्फ प्रफुल्ल निकम व सोपान लक्ष्मण कोपरे यांनी बुधवार दि ९ जून २०२१ रात्री ९ वाजेपासून ते गुरुवार दि १० जून २०२१ सकाळी ७ वाजेच्या दरम्यान डोक्यावर व शरीरावर काहीतरी टणक हत्याराने तसेच लाथाबुक्यांनी  मारहाण करून माझे पती बाबुराव छबुराव निकम यांचा खून करून मृतदेह सुरेगाव कोळगाव थडी रस्त्याचा कडेला नाल्यात फेकून दिली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.
 सदर घनटनेची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळताच तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या समवेत  घटनास्थळी भेट देत मृतदेहचा पंचनामा करत मृतदेह पोस्ट मोर्टम करिता सरकारी दवाखान्यात पाठवून गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले असून  रजिस्टर नंबर I-२०७/२०२१ भा द वी कलम ३०२,३२३ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय  पोलिस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करत असून सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी देखील भेट दिली.

COMMENTS