गोवंश हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा… मुस्लिम समाजाने केली मागणी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोवंश हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा… मुस्लिम समाजाने केली मागणी (Video)

संगमनेर शहरात तीन दिवसांपूर्वी कत्तलखान्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्येे एक कोटी रुपयांचे31 हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. तसेच 71 जिवंत

कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा संगम म्हणजे स्व.शंकरराव काळे-उपमुख्यमंत्री
‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबवा
बैलाने मारल्याने ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

संगमनेर शहरात तीन दिवसांपूर्वी कत्तलखान्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्येे एक कोटी रुपयांचे
31 हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. तसेच 71 जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश कुठून आले?  कत्तलखाने चालकांना हे गोवंश कोणी विकले याची चौकशी होऊन त्यांच्यावर ही गुन्हे दाखल झाले पाहिजे. तरी संगमनेर शहरातील गोवंश हत्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी यातील दोषींना ज्यांनी जनावरे विकली आहे त्याचीही चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी संगमनेर येथील मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांना हे निवेदन देण्यात आले.

COMMENTS