Homeमहाराष्ट्रसातारा

गोंदवले गावात पुन्हा लॉकडाऊन; एकाच दिवशी 11 रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धांदल

कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना बाधितांमध्ये अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास येताच बुधवार, दि. 23 रोजी पुन्हा गोंदवले गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

BREAKING: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द | Lok News24
कर्जतमध्ये दहा लाखांची लूट ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
आमिर खानचा ‘मास्टरपीस’ लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर प्रदर्शित | LOKNews24

गोंदवले / वार्ताहर : कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना बाधितांमध्ये अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास येताच बुधवार, दि. 23 रोजी पुन्हा गोंदवले गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सकाळी केलेल्या तपासणीदरम्यान एका भागात 11 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीची मोहीम सुरू केली आहे.

माण तालुक्यातील गोंदवले येथे आत्तापर्यंत एकूण 412 कोरोना बाधित रुग्ण सापडले तर 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी गावात रुग्णसंख्या दहा होती. त्यात काल एकाची भर पडली असली तरी कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याची समाधानकारक बाब होती. सातारा जिल्ह्यातील रुग्णासंख्येत मोठी घट होत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोंदवले येथे मात्र अद्यापही निर्बंध शिथिल केले नव्हते. येत्या दोन ते तीन दिवसांत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता असताना बुधवारी सकाळी पुन्हा येथील रुग्ण संख्या वाढली. एकाच वेळी तब्बल 11 रुग्णांची भर पडल्याने अजूनही कोरोनाचा धोका असल्याचे दिसून आले. 

गावात अचानक रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाने उपाययोजनांना वेग आला. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मदतीने आरोग्य विभागाने गावात तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे. संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी प्रांताधिकाऱी शैलेश सूर्यवंशी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता गोंदवले गावात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS