गॅस सिलिंडर 73 रुपयांनी महागला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस सिलिंडर 73 रुपयांनी महागला

मुंबई : इंधर दरवाढ सुरू असतांनाच रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 73.50 रुपयांची वाढ केली आहे. तर घरग

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट एडिटर संजय वर्मा यांचे निधन
पिंपरी महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी ’गोड’
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा कोट्यवधींचा घोटाळा उघड | LOKNews24

मुंबई : इंधर दरवाढ सुरू असतांनाच रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 73.50 रुपयांची वाढ केली आहे. तर घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा दर जुलै प्रमाणे कायम ठेवला आहे. त्यामुळे आजच्या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांना कंपन्यांनी दणका दिला असून सामन्य ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.
इंडियन ऑइलनुसार रविवारी 1 ऑगस्टपासून देशभरात वाणिज्य वापराचा 19 किलोचा गॅस सिलिंडर 73.50 रुपयांनी महागला आहे. या दरवाढीनंतर मुंबईत 19 किलोचा गॅस सिलिंडर 1579.50 रुपये झाला आहे. दिल्लीत तो 1623.50 रुपये झाला आहे. चेन्नईत त्याची किंमत 1761 रुपये आहे. तर कोलकात्यात 19 किलोचा गॅस सिलिंडर 1623 रुपये आहे. दरम्यान, कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत आणि दिल्लीत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर 834.50 रुपये आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 1 जुलै रोजी घरगुती वापराच्या 14.2 किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली होती. 19 किलोचा गॅस सिलिंडर 84 रुपयांनी महागला होता. महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने 15 जुलैपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2.58 रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट 55 पैसे वाढ केली होती. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा भाव एक किलोसाठी 51.98 रुपये इतका झाला. पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्यात आली. त्यानुसार स्लॅब-1 साठी 30.40 रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-2 साठी 36 रुपये प्रती युनिट दर झाला होता.

COMMENTS