गाव तिथे विलगीकरण केंद्र सुरू करावे- विवेक कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

गाव तिथे विलगीकरण केंद्र सुरू करावे- विवेक कोल्हे

देशासह राज्यात मोठया प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे.

*लसींच्या किमती बाबत सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल! पहा ‘सुपरफास्ट २४’ | LokNews24*
मजुरीचे पैसे मागितल्याने दाम्पत्यास बेदम मारहाण
परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

कोपरगाव शहर प्रतिनिधी- देशासह राज्यात मोठया प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांची संख्या पहाता पुरेशा सोयीसुविधा नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे.विलगीकरण नसल्यामुळे इतरांच्या संपर्कात येणा-यांमुळे रूग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. विलगीकरण कक्ष वाढविल्यास निष्चितच रूग्णसंख्येला आळा बसेल.याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे,अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांचेकडे केली 
आहे.
जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात श्री.कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे, प्रशासनाकडून सोयीसुविधा अपुर्ण आहेत,तसेच विलगीकरण कक्षच नसल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबाधित असलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना संसर्ग होउन रूग्ण संख्या वाढत आहे.त्याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू केल्यास रूग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.
गावपातळीवर अनेक डाॅक्टर्स प्रॅक्टीस करत आहेत,खेडोपाडी जाउन वैदयकिय सेवा देणा-यां डाॅक्टरांची मोठी संख्या आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने रूग्णांना त्रास जाणवू लागल्यास त्यांचेवर गावपातळीवर प्राथमिक उपचार झाले तर रूग्ण संख्या अटोक्यात येईल.त्याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करावेत, अशी मागणी श्री.कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS