कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी क
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. तरडगावचे कृषी सहाय्यक विश्वास तोरडमल, ग्रामविकास अधिकारी बापुसाहेब निंबोरे, इंजिनियर नर्सिंग शेंडकर, सरपंच संगीता वैजीनाथ केसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर तरडगाव येथील मागासवर्गीय, अपंग, विधवा महिला, कोरानामध्ये मयत कुटुंबे व गरजू शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी बियाण्यांचे कृषी विभागामार्फत मोफत वाटप करण्यात आले. गांधी जयंतीचे औचित्य साधून गावकऱ्यांनी ग्रामस्वच्छतेची शपथ घेऊन ग्रामपंचायत व शाळेचा परिसर स्वच्छ केला. गांधींचे विचार खूप महान असून त्यांनी सत्य व हिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी स्वच्छतेला देखील खूप महत्त्व दिले. याच अनुषंगाने स्वच्छ गाव, सुंदर गाव व हागणदारीमुक्त गाव करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.
कृषी सहाय्यक विश्वास तोरडमल यांनी उपस्थित ग्रामस्थांना शेती विकासाबाबत मार्गदर्शन केले त्याचबरोबर रब्बी ज्वारी, हरभरा इत्यादी बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशाप्रकारे करण्यात यावी, याचे प्रात्यक्षिक बीजप्रक्रिया करून दाखवली व मका, तूर या पिकांवरील आळ्यापासुन संरक्षण करण्यासाठी कामगंध सापळे यांचे वाटप करण्यात आले, तसेच शेतकऱ्यांना पिकासंदर्भात काही गरज भासल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब निंबोरे म्हणाले, गावाचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, कारण लोकसहभागातून आपण अनेक कामे करू शकतो तसेच गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण एक निर्धार करूया की आपले गाव स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त करुया यासाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जातील तरी गावकर्यांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ केसकर यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नेटके, भास्कर केसकर, रामदास देवमुंडे, कचरु केसकर, आप्पा देवकाते, पिंटू देवमुंडे, शिवाजी केसकर,शरद देवकाते, आप्पा केसकर,बापू देवमुंडे, आण्णासाहेब देवमुंडे, संतोष केसकर, अभिमान शेंडकर, संजय देवमुंडे, बबन हजारे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उपसरपंच भरत देवमुंडे यांनी मानले.
COMMENTS