गड पर्यटनाला चालना देणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गड पर्यटनाला चालना देणार

पुणे/प्रतिनिधीः गेल्या काही वर्षांत गिर्यारोहकांची संख्या वाढली असून, सुट्टीच्या दिवशी शेकडो लोक गडकिल्ल्यांवर भटकंतीला जातात. वेगवेगळ्या राज्यांतून

अंगणवाडी सेविकांचा 20 फेबु्रवारीपासून बेमुदत संप
रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
BREAKING: अनिल देशमुख यांचं राजीनामा | Anil Deshmukh Resign | Lok News24

पुणे/प्रतिनिधीः गेल्या काही वर्षांत गिर्यारोहकांची संख्या वाढली असून, सुट्टीच्या दिवशी शेकडो लोक गडकिल्ल्यांवर भटकंतीला जातात. वेगवेगळ्या राज्यांतून दुर्गभ्रमंतीला येणार्‍यांची संख्याही मोठी आहे; मात्र गडावर नागरिकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, याची दखल घेऊन स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. 

राज्यातील किल्लयांंवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने किल्ले पर्यटनाचा आराखडा जाहीर केला आहे. दुर्ग अभ्यासक, दुर्गप्रेमींच्या सहभागातून केलेल्या हा मसुद्यावर हरकती आणि सूचना पाठविण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गडावर फिरायला येणार्‍या पर्यटकांचे आदरातिथ्य करण्याबरोबरच त्यांना किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व कळावे, या दृष्टीने धोरणामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात पश्‍चिम घाटातील डोंगररांगांमध्ये, सागरी किनार्‍यावर चारशेहून अधिक किल्ले आहेत. यातील गिरीदुर्ग, काही भूदुर्ग (नदीकिनारी, पठारी भागावर, वसाहतींमध्ये) तर काही जलदुर्ग आहेत. या विविध किल्ल्यांवर गिर्यारोहणासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. या 435 किल्ल्यांपैकी 337 किल्ले महसूल आणि वन विभागाच्या ताब्यात; तर उर्वरित केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाकडे आहेत. महसूल आणि वन विभागाच्या अखत्यारीतील किल्ल्यांवर पर्यटकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. किल्ल्यांच्या पायथ्याला पर्यटकांसाठी ’कॅरव्हॅन कॅम्पिंग’ आणि ’टेंट कॅम्प’साठी जागा उपलब्ध करण्यात येईल. खासगी गुंतवणूकदारांना यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल; तसेच किल्ल्यांच्या पायथ्याशी पार्किंगची सोय उपलब्ध करण्याचा विचार आहे. यासाठी खासगी जमीनदारांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. किल्ल्यांवर विकासकामांसाठी केलेला खर्च पर्यटकांकडून आकारण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील प्रवेश, पार्किंग, प्रसाधन गृहाचा वापर या सेवा सशुल्क राहणार असून जाहिराती, शूटिंग प्रकल्पांसाठी जागा देऊन हा खर्च वसूल करण्यात येणार आहे. या सर्व नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये किल्ल्यांशी संबंधित सर्व खात्यातील अधिकार्‍यांचा समावेश असेल. या धोरणांतर्गत उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी समितीही नेमण्यात येणार आहे.

COMMENTS