गंजीवर झाकण टाकण्यासाठी गेलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंजीवर झाकण टाकण्यासाठी गेलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू

आखेगणी (ता. जावळी) येथे रविवारी मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्‍वर गावडे (वय 35) या युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

संवत्सर शाळेला 15 लाखाचे पारितोषिक
सुशांतसिंहचा हत्यारा कोण?; नवाब मलिक यांचा सवाल l पहा LokNews24
परप्रांतियाकडं मिळाले पिस्तुलासह पाच काडतुसे | DAINIK LOKMNTHAN

भिलार / वार्ताहर : आखेगणी (ता. जावळी) येथे रविवारी मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्‍वर गावडे (वय 35) या युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, की आखेगणी येथे सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या वेळी विजांचा कडकडाट झाला. ज्ञानेश्‍वर तुकाराम गावडे हा युवक घराच्या जवळच असणारी गवताची गंज भिजू नये, म्हणून त्याच्यावर झाकण टाकण्यासाठी गेला होता.

यावेळेस अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. वीजेच्या धक्क्याने तो भाजून जमिनीवर पडला. ग्रामस्थांना ही माहिती समजताच त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतू भिलार येथील खासगी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो ज्ञानेश्‍वर मयत झाल्याचे सांगितले.

ज्ञानेश्‍वर हा गरीब शेतकरी कुटुंबातील असून, वडील वृध्द आहेत. तो स्ट्रॉबेरी शेती करून आपली उपजीविका करत होता. या शेतीवरच त्याचे कुटुंब अवलंबून होते. घरात ज्ञानेश्‍वर हा घरातील कर्ता मुलगा असल्याने त्याचेवर काळाने घाला घातल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूच्या घटनेने आखेगणी गावावर शोककळा पसरली आहे.

COMMENTS