मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर आज, सोमवारी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकली. भाजपाने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी
मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर आज, सोमवारी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकली. भाजपाने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आज ईडीने धाड टाकत भावना गवळी यांच्या संस्थाची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये गवळी यांच्या साई डोमेस्टिक प्रायव्हेट लिमिटेड साई भूमी कन्स्ट्रक्शन, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, साईस्थान डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, दानिश इन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचा समावेश आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या 20 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. सोमय्या यांच्या आरोपानुसार गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्यसरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गवळी यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार सोमय्या यांनी सांगितले होते.
COMMENTS