खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडाकडून वसुलीसाठी दमदाटी : साजीद मुल्ला

Homeमहाराष्ट्रसातारा

खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडाकडून वसुलीसाठी दमदाटी : साजीद मुल्ला

कोरोना महामारीच्या काळातही खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडाकडून सर्वसामान्य जनतेला वसुलीच्या नावाखाली होणारी दमदाटी प्रशासनाने तात्काळ थांबवावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांच्यातर्फे करण्यात आली आहे.  

पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा : अजित पवार
खासदार विनायक राऊत यांचे योगदान शुन्य | LokNews24
धुळवडीला माहेरी गेलेल्या पत्नीच्या कृत्यामुळे पतीची आत्महत्या | LOKNews24

कराड / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळातही खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडाकडून सर्वसामान्य जनतेला वसुलीच्या नावाखाली होणारी दमदाटी प्रशासनाने तात्काळ थांबवावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांच्यातर्फे करण्यात आली आहे.  

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे गेली दोन ते तीन महिने झाले प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यात लाकडाऊन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेने प्रशासनाला सहकार्य केले. अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. मात्र, खाजगी फायनान्स बँकांचे व्याज मात्र चालू राहिले. सर्वसामान्य जनतेला हातात काम नसल्यामुळे तीन ते चार महिने घरात बसून काढावे लागले. सातारा जिल्ह्यात अंशतः लाकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परंतू, अद्यापही दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले नाहीत. अशा कोरोनाच्या संकटातही खाजगी फायनान्सवाले बजाज, चोला मंडलम्, एक विटास आदी फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून सर्वसामान्य जनतेला वसुलीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला दमदाटी केली जात आहे. प्रसंगी शिवीगाळ केली जात आहे. अगदी वसुलीसाठी असणार्‍या गुंडाकडून मारहाणीचे प्रकार होत आहेत. ज्याप्रमाणे प्रशासन लाकडाऊनबाबत प्रशासन जिल्ह्यातील जनतेला नियम पाळण्यासाठी आदेश काढते. त्याच प्रमाणे प्रशासनाच्या वतीने खाजगी फायनान्स बँकांच्याकडून होणार्‍या वसुलीसाठी सहा महिने मुदतवाढ देण्याचा आदेश काढावा. खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून सर्वसामान्य जनतेला वसुलीच्या नावाखाली दमदाटीचे प्रकार सुुरु आहेत. त्या फायनान्स कंपनीच्या संबंधितांवर कारवाई करावी. प्रशासनाच्या वतीने खाजगी फायनान्स बँकांच्याकडून होणार्‍या कर्ज वसुलीसाठी सहा महिने मुदतवाढ द्यावी जर खाजगी फायनान्स कंपनीचे गुंड वसुलीच्या नावाखाली दमदाटीचे प्रकार करून लागले तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकर्‍यांना बरोबर घेऊन सक्तीच्या कर्जवसुली विरोधात मोठे जन आंदोलन उभे करु. होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला

COMMENTS