नगर येथील बालिकाश्रम परिसरात व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांना गुन्हेगार वृत्तीच्या गुंडांनी 20 मार्च रोजी दुकानात घुसून धुडगूस घालून मारहाण केली व खंडणीची मागणी केली आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी – नगर येथील बालिकाश्रम परिसरात व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांना गुन्हेगार वृत्तीच्या गुंडांनी 20 मार्च रोजी दुकानात घुसून धुडगूस घालून मारहाण केली व खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी अक्षय राजेंद्र जाधव यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांना निवेदन देऊन या गुंडांचा बंदोबस्त करण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, बालिकाश्रम रोडवर रुबाब मेन्सवेअर या फर्मच्या नावाने असलेला माझा वाढता व्यवसाय पाहून व त्यावर सतत लक्ष देऊन गुन्हेगारी व अपप्रवृत्तीच्या गुंड व्यक्तींकडून 20 रोजी दुपारच्या वेळी अनाधिकाराने घुसून लोखंडी रॉड, लाकडी दांडके याद्वारे माझ्या दुकानातील कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन व दुकानाची तोडफोड करुन नुकसान करुन खंडणी मागण्याचा प्रकार झालेला आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खंडणीसारखा गंभीर बेकायदेशीर प्रकार दुपारच्या सुमारास 3.30 ते 4 वाजल्याच्या सुमारास घडतो. नगर शहरासह परिसरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले नगरमधून तडीपार केलेले गुन्हेगार विजय पठारे, सूरज साठे, राहुल झेंडे, मयूर चावरे, अक्षय शिरसाठ व त्यांचे साथीदार संघटीतपणे गुन्हेगारी करुन राजरोसपणे भरदुपारी दुकानात घुसून खंडणी मागून दुकानाची तोडफोड करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल असतानाही अद्यापही आरोपी मोकाट असल्याने पोलिस आरोपींना पाठीशी घालत तर नाही ना, असाच प्रश्न निर्माण होत आहे. आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी अक्षय जाधव, अजय साळवे, विशाल साळवे, प्रवीण साळवे, किरण पटेकर, सुनील साळवे, विनोद साळवे, ऋतिक साळवे, रविराज साळवे, करण साळवे, किरण पवार, महेंद्र जाधव, महेंद्र साळवे उपस्थित होते.
COMMENTS