क्रूरतेचा कळस : १४ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रूरतेचा कळस : १४ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार…

प्रतिनिधी : मुंबई १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २३ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल

मराठी फलक नसल्याने 522 दुकानदारांना नोटीस
रेल्वेत चढतांना पाय घसरला… महिला रक्षकाने वाचवले प्राण… पहा व्हिडीओ
Mumbai : 10 लाखांची लाच घेतांना शाखा अभियंताला रंगेहाथ पकडले | LokNews24

प्रतिनिधी : मुंबई

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २३ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह ‘पोक्सो’ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला होता. 

याआधारे आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करत अत्याचार केले आहेत. त्यानंतर मुलीवर आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. 

बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका परिसरात ३० वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली. 

ही घटना ताजी असताना अशातच डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. 

COMMENTS