Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात येत्या रविवारपासून कडक लॉकडाऊन

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडाही वाढत आहे.

कोरोनाच्या 23 टक्के लसीचा अपव्यय ; सुमारे तीन हजार कोटींचा फटका; 45 लाख डोस वाया
दान..
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं मोडली स्वत:ची एफडी | | LokNews24

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात आज आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात येत्या रविवारपासून कडक लॉकडाऊन होणार असल्याची माहिती दिली. पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जिल्ह्याला कडक लॉककडाऊनची गरज असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले. येत्या 16 मे पासून ते 23 मेपर्यंत असा एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन करण्याचे विचाराधीन असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडायची असल्यास कडक लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, याबाबतचा आदेश आणि नियमावली उद्या गुरूवार, दि. 13 रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देसाई यांनी दिली.

COMMENTS