कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज : विवेकभैया कोल्हे.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज : विवेकभैया कोल्हे.

कोपरगाव शहर प्रतिनिधी- संपुर्ण विश्वाला ज्या महामारीने व्यापले आहे, प्रगतशील देशातील जीवन ज्या मुळे कोडमडले आहे, त्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.

आमदार पवारांच्या प्रयत्नातून काळे-मदने वस्तीवर विजेची सोय
जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू घडवण्यासाठी सहकार्य करू ः विवेक कोल्हे
महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात

कोपरगाव शहर प्रतिनिधी- संपुर्ण विश्वाला ज्या महामारीने व्यापले आहे, प्रगतशील देशातील जीवन ज्या मुळे कोडमडले आहे, त्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. या परिस्थितीमध्ये प्रशासन काम करत आहे. परंतु या वैश्विक महामारीचा मुकाबला करण्याचे हे काम केवळ एकटया प्रशासनाचे नाही, अनेक अडचणींवर मात करत प्रशासन काम करत आहे, कोपरगाव तालुक्यावर आलेले हे संकट निश्चितच भयावह आहे.

त्यासाठी तालुक्यातील संस्था आणि दानशूर व्यक्तीने पुढे येउन सामुहीक प्रयत्न करण्याची गरज असून यासाठी तालुक्याचे आमदार आणि तहसिलदारांनी संयुक्त बैठक घेउन यातून मार्ग काढावा,असे आवाहन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी केले. कोपरगाव येथील कोविड सेंटर येथे श्री विवेक कोल्हे यांनी भेट दिली. उपस्थित रूग्णांशी संवाद साधत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून येणा-या अडचणी समजून घेतल्या. रूग्णांसाठीचे बेड, आॅक्सीजन आणि औषधांचा तुटवडा होत असल्याचे यावेळी रूग्णांनी सांगितले. त्याचप्रमाणे या कामासाठी असलेल्या वैदयकिय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करत त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या.यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले,एकेकाळी महाराष्ट्र राज्यात आदर्श गणल्या गेलेल्या आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक नामांकित संस्था आहे.विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कुटूंबाना आधार मिळालेला असुन हजारो कामगार काम करीत आहे.या सर्व संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी व्यवस्थापणाचा अनुभवही आहे.त्यात संजीवनी उद्योग समूह व कोळपेवाडी उद्योग समूह,सर्व वित्तीय संस्था,समता समुह,गोदावरी उद्योग समूह,सोमैय्यां सारखे अनेक उद्योजक व उद्योग समूह,ज्योती समूह असे अनेक दानशूर व्यक्ती या तालुक्यात विविध माध्यमातून जनसेवा करीत आहे.कोपरगाव तालुक्यातून जाणा-या समृध्दी महामार्गाचे काम सध्या सुरू असुन यासाठी काम करणारे गायत्री कन्स्ट्रक्शनसारखे उद्योजकही यासाठी निश्चितच मदत करतील.आणि या सर्व व्यवस्थापनासाठी जागतिक किर्तीचे देवस्थान जंगलीदासजी महाराज तसेच संत जनार्दन स्वामी आश्रमाचीही मोलाची मदत या कामी होऊ शकते.त्यामुळे या सर्वांना एकत्र आणून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कोणीही नकार देणार नाही,या सार्वत्रिक प्रयत्नातून मोठा निधी उभा राहून अनेक आवश्यक त्या उपाययोजना राबवता येतील,त्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि तहसिलदार यांनी या सर्वांच्या प्रतिनिधिंची संयुक्त बैठक घ्यावी व सर्वांशी विचारविनिमय करून वैश्विक महामारीला सामोरे जाण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे श्री.कोल्हे म्हणाले.

गेल्या वर्षभरापासून या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण काम करीत आहे,यापुर्वीही संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातून याकामासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी,मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरीव योगदान दिलेले आहे आणि स्थानिक पातळीवरही अनेक उपाययोजना आणि सुविधा देण्याचा प्रयत्न उद्योग समूहाच्या वतीने सातत्याने सुरू आहे.कोरोनाची आलेली ही दुसरी लाट अतिशय भयंकर असुन दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या चिंताजनक आहे.त्यात जाणवणारा औषधांचा तुटवडा त्याचप्रमाणे आॅक्सीजनची भासणारी कमतरता यामुळे या चिंतेत आणखी भर पडत आहे.यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सामुहीक प्रयत्न करण्यासाठी आमदार व तहसिलदारांनी संयुक्त बैठक बोलवून मार्ग काढावा,असे मतही श्री विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

COMMENTS