कोरोना काळात ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्यांना मदत मिळवून देणार – प्रकाश इथापे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना काळात ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्यांना मदत मिळवून देणार – प्रकाश इथापे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात मृत झालेल्या कुटुंबाची मदत करण्यासाठी क्षत्रिय मराठा परिवार संघटना मैदानात उतरली असुन क्षत्रिय मराठा परिवार संघट

उपक्रमशिल शिक्षकांमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला – डॉ . संजय कळमकर
अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
Ahmednagar :वाराईचा प्रशन बिकट…व्यापारी गेले जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी

अहमदनगर (प्रतिनिधी)-

कोरोना काळात मृत झालेल्या कुटुंबाची मदत करण्यासाठी क्षत्रिय मराठा परिवार संघटना मैदानात उतरली असुन क्षत्रिय मराठा परिवार संघटनेची अहमदनगर कार्यकारीणी आढावा बैठक अहमदनगर विक्षामगृह येथे पार पडली यावेळी विविध पदाधिकार्याची निवड करण्यात आली क्षत्रिय मराठा परिवार संघटना गेल्या काही काळापासुन सामाजिक काम करत आहेत 

संघटनेचे वैशिष्ट्य सर्व आठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आठरा पगडजातीसाठी काम करने हे आहे त्याचबरोबर स्वतःसाठी तर सर्वच जगतात दुसर्या साठी जगुन पहा हे ब्रीद वाक्य घेऊन समाज्याच्या प्रश्नांवर संघटना काम करत आहेत विविध सामाजिक विषयांवर नेहमी संघना आवाज उठवुन लोकांना न्याय देण्याचे देखील काम करत असते मराठा परिवाराचे संस्थापक प्रदेश उपाध्यक्ष गणेश शिंदे यानी बोलताना सांगितले कि क्षत्रिय मराठा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात  आढावा बैठक पार पडली 

महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय पवार तसेच महिला प्रदेश संघटक मनिषाताई चोणकर आणि  नगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीत या आढावा बैठकीत नगर जिल्ह्यात काय काय कामे केली आहेत याचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात  आली महाराष्ट्राला महामारीचे जे संकट आले या संकटात मराठा परिवाराच्या वतीने खुपच चांगले काम करण्यात आले . बालकल्याण समितीला निवेदन देऊन कोरोना काळात ज्या महिलांच्या पतिचे व घरांमधला कर्ताया पुरुषाचे निधन झाले आहे त्यांना  बाल  कल्याण  समिती मार्फत आर्थिक मदत मिळावी म्हणून  वेळोवेळी पाठ पुरावा केला 

त्यांना शक्य त्या शासनाच्या संजय गांधी निराधार तसेच विविध लोकोपयोगी योजनेची माहिती संघटनेच्या वाडिया पार्क येथील जनसम्पर्क कार्यालयामार्फत दिली जाईल असे गणेश शिंदे यांनी यावेळी सांगितले तसेच केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हा महिला उप प्रमुख अश्विनीताई होणे, जिल्हा महिला प्रमुख शीतलताई लोंढे , जिल्हा संपर्क प्रमुख कुमार जाधव, जिल्हा संयोजक ऋषी साबळे, जिल्हा युवक प्रमुख राजू शेळके, जिल्हा कार्यकारी प्रमुख बाळासाहेब कोह्राळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गोवर्धन गाडगे, जिल्हा प्रमुख प्रकाश इथापे यांची अहमदनगर पदावर पदोन्नती करण्यात आली. बैठकीस जिल्हा सचिव गणेश दळवी याच्या सह नगर, शेवगाव, कर्जत,राहाता,कोपरगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS