कोरोनामुळे शहर बँकेच्या वसुलीवर परिणाम ; यंदा 1 कोटीचा नफा, ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनामुळे शहर बँकेच्या वसुलीवर परिणाम ; यंदा 1 कोटीचा नफा, ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात

कोरोना विषाणूचे महाभंयकर संकट आल्यामुळे मोठे उद्योग धंदे, कारखानदार व छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले तसेच अनेकांचा रोजगार गेल्यामुळे संपूर्ण देशातील बँकांवर आर्थिक परिणाम झाला व त्यांच्या वसुलीवरही परिणाम झाला.

संजीवनीचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल
राहुरीमध्ये आणखी एका पोलिस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा इशारा
शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना विषाणूचे महाभंयकर संकट आल्यामुळे मोठे उद्योग धंदे, कारखानदार व छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले तसेच अनेकांचा रोजगार गेल्यामुळे संपूर्ण देशातील बँकांवर आर्थिक परिणाम झाला व त्यांच्या वसुलीवरही परिणाम झाला. त्यांची आर्थिक उलाढाल, देवाण-घेवाण कमी झाली. कर्जाची परतफेडही कमी झाल्याने वसुलीवर परिणाम झाला. 

तरीसुद्धा अहमदनगर शहर सहकारी बँकेने पारदर्शक कारभार केला असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केले. अहमदनगर शहर सहकारी बँकेची 49 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात झाली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातही शहर सहकारी बँकेला 2019-20 चा अ ऑडीट वर्ग मिळाल्याचे सांगून अध्यक्ष गुंदेचा म्हणाले, गेल्या वर्षापासून संपूर्ण देश आर्थिक संकटात असतानाही बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळेच या वर्षीचा बँकेला अ ऑडीट वर्ग मिळाला आहे. या सर्वसाधारण सभेस संचालक सीए गिरीश घैसास, संचालक डॉ. विजय भंडारी, अशोक कानडे, शिवाजी कदम, संजय घुले, संचालिका रेश्मा आठरे, जॉईंट मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, कामगार प्रतिनिधी संजय मुळे, संतोष मखरे उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे ही वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी सभेत मोठ्या संख्येने सभासदांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. सभासद बी. एम. बांदल, नंदकुमार जगताप, रघुनाथ हजारे, चंद्रकांत लिपारे, पराग डेरे आदींनी विविध सूचना मांडल्या. विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान यांनी केले. सभासदांनी सर्व विषयांना एकमुखाने मंजुरी देऊन दिली. सभासदांचे आभार उपाध्यक्ष सुजित बेडेकर यांनी मानले.

चौकट

शहर बँकेची आर्थिक प्रगती

-31 मार्च 2020 अखेरच्या एकूण ठेवी 648 कोटी 17 लाख आहेत. मागील वर्षी म्हणजे 2018-19 या वर्षात ठेवी 631 कोटी 56 लाखाच्या होत्या.

-31 मार्च 2020 अखेरचे एकूण येणे कर्ज 417 कोटी 90 लाख आहे. 2018-19 या वर्षात एकूण येणे रक्कम 460 कोटी 58 लाख होती.

-बँकेचा मिश्र व्यवसाय 2018-19 या वर्षात 1092 कोटी 14 लाखाचा होता. तो 2019-20 या आर्थिक वर्षात 1066 कोटी 7 लाखाचा झाला आहे.

-बँकेची 31 मार्च 2020अखेरची गुंतवणूक 246 कोटी 27 लाखाची आहे.

-बँकेचे वसुल भाग भांडवल 14 कोटी 14 लाखाचे आहे. 31 मार्च 2019 रोजी वसुल भाग भांडवल 14 कोटी 95 लाख होते. वसुल भाग भांडवलात घट झाली आहे.

-बँकेचा स्वनिधी 100 कोटी 10 लाखाचा आहे.

-बँकेची ग्रॉस एनपीए रक्कम 109 कोटी 91 लाख 5 हजाराची आहे. एनपीए तरतूद 45 कोटी 60 लाखाची आवश्यक असताना बँकेने 46 कोटी 20 लाखाची केली आहे.

– बँकेचा ढोबळ नफा 4 कोटी 12 लाख 92 हजार इतका असून, यातून तरतूद वजा जाता नेट ऑपरेटिंग प्रॉफिट 2 कोटी 87 लाख 92 हजार आहे. यातून 1 कोटी 25 लाख प्राप्तिकर (आयकर) वजा जाता बँकेस निव्वळ नफा 1 कोटी 16 लाखाचा झाला आहे.

COMMENTS