कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा : विवेक कोल्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा : विवेक कोल्हे

कोपरगाव तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता,त्याप्रमाणात रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा पुन्हा अडचणीत … सीसीटीव्ही घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
हातगाव येथे शनिवारच्या मध्यरात्री चोरट्यांचा चार तास धुमाकूळ | माझं गाव, माझी बातमी | LokNews24
खोटे बोलणे आपली संस्कृती नाही: आमदार रोहित पवार

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता,त्याप्रमाणात रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोपरगाव तालुक्याकरीता रूग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसे इंजेक्शन मिळावे व कोपरगाव तालुक्याच्या बाबतीत अन्याय होऊ नये अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांचेकडे केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वैद्यकिय सेवा अपुऱ्या पडत आहे. उपलब्ध कोविड सेंटरमध्ये असलेल्या बेडची संख्येची कमतरता असून कोपरगाव तालुक्यासाठी पुरविण्यात येणारी रेमडीसीवीर इंजेक्शनची संख्याही रूग्णसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात मिळत आहे.सध्या शहरातील सर्वच कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रूग्णांसाठी रेमडिसिवीरची मागणी होत आहे.इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्यावर इंजेक्शन शोधण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आलेली आहे.

रेमडीसीवीर इंजेक्शन करीता नेमणूक असलेले नोडल अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम व अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त श्री.कातकडे यांची भेट घेत श्री.कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्याला रूग्णसंख्येच्या तुलनेत रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसून कोपरगाव तालुका हा जिल्हा आकडेवारीत प्रथम पाच तालुक्यांच्या यादीत असल्याने त्या तुलनेत रेमडिसिवीर इंजेक्शन मिळावे असे निदर्शनास आणून देत तालुक्यासाठी रेमडीसीवीर इंजेक्शन पुरवठा करण्याची मागणी केली,त्यानुसार श्री.कदम व श्री.कातकडे यांनी सकारात्मक प्रतिसाद कोपरगावसाठी रेमडिसिविरचा पुरवठा करण्याचे आश्वसित केले

COMMENTS